शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 15:11 IST

Sigachi Industries News: सिगाची फॉर्मास्युटिकल कंपनीच्या तेलंगणातील रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट झाला. यात मोठी जीवितहानी झाली आहे. 

Sigachi Blast: औषधी बनवणाऱ्या कंपनीच्या कारखान्यात रासायनिक भट्टीचा स्फोट झाल्याची भयंकर घटना सोमवारी घडली. तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात सिगाची फार्मास्युटिकल कंपनीच्या कारखान्यात ही घटना घडली आहे. यात दहा कामगारांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. काही जण ढिगाऱ्याखाली दबले गेले. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सिगाची इंडस्ट्रीजचे तेलंगणातील पाशमैलारममध्ये रासायनिक कारखाना आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती मिळताच वेगवेगळ्या अग्निशामक दलाच्या केंद्रावरून बंब पाठवण्यात आले. त्याचबरोबर एनडीआरएफ, डीआरएफ आणि एसडीआरएफची पथके बोलावण्यात आली.

दहा जणांचा मृत्यू 

रासायनिक कंपनीत झालेला स्फोट इतका भीषण होता की, संपूर्ण बिल्डिंग खाली कोसळली. स्फोटाच्या तीव्रतेने आजूबाजूलाही हादरे जाणवले. या घटनेत १० कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पण, प्रशासनाकडून याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर काहींचा रुग्णालयात नेताना आणि नेल्यानंतर मृत्यू झाला. 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, २० ते २६ लोक या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. काही जण ढिगाऱ्याखालीही दबले गेले आहेत. त्यामुळे वेगाने बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मल्टी झोन २ चे आयजी सत्यनारायण यांनी सांगितले की, या घटनेत एकूण ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. सहा मृतदेह घटनास्थळी आढळून आले आहेत. दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचबरोबर २६ जण जखमी आहेत.

सिगाची स्फोट, काय घडलं?

घटना ८.१५ ते ९.३५ या वेळेत घडली. याची माहिती मिळताच पोलीस २० मिनिटात घटनास्थळी दाखल झाले.  ११ अग्निशामक दलाचे बंब आणि एनडीआरएफ, एसडीआरएफच्या जवानांनाही बोलवण्यात आले. दोन ते तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

वाचा >>'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता

स्फोट झाला त्यावेळी कंपनीत १५० लोक काम करत होते. स्फोट झालेल्या भागात ९० लोक काम करत होते, असेही आयजी व्ही. सत्यनारायण यांनी सांगितले. 

टॅग्स :Blastस्फोटTelanganaतेलंगणाDeathमृत्यूPoliceपोलिस