बीकानेरमधील फिल्ड फायरिंग रेंजमध्ये तोफेच्या सरावादरम्यान स्फोट, दोन जवानांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 17:35 IST2024-12-18T17:34:45+5:302024-12-18T17:35:09+5:30
Blast In Bikaner Firing Range: राजस्थानमधील बीकानेर येथे असलेल्या महाजन फिल्ड फायरिंग रेंजमध्ये तोफेच्या सरावादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. सरावादरम्यान बॉम्बचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत दोन जवानांचा मृत्यू झाला आहे.

बीकानेरमधील फिल्ड फायरिंग रेंजमध्ये तोफेच्या सरावादरम्यान स्फोट, दोन जवानांचा मृत्यू
राजस्थानमधील बीकानेर येथे असलेल्या महाजन फिल्ड फायरिंग रेंजमध्ये तोफेच्या सरावादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. सरावादरम्यान बॉम्बचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात महाजन फिल्ड फायरिंग रेंजच्या नॉर्थ कॅम्पमध्ये चार्ली सेंटर येथे झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका जवानाला सूरतगड येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बीकानेर येथील महाजन फिल्ड फायरिंग रेंजमध्ये तीन दिवसांपूर्वीही अशाच प्रकारची एक दुर्घटना घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार १५ डिसेंबर रोजी तोफखान्याच्या तैनातीच्या प्रशिक्षणादरम्यान लष्कराच्या एका जवानाला हौतात्म आलं होतं. उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर जिल्ह्यातील ३१ वर्षीय गनर चंद्रप्रकाश पटेल यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला होता.