Explained How TikTok has users in India despite the ban how they using social media app tiktok | Explained : जाणून घ्या भारतात बंदीनंतरही कसं वापरलं जातंय TikTok

Explained : जाणून घ्या भारतात बंदीनंतरही कसं वापरलं जातंय TikTok

ठळक मुद्देसुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकवर सरकारनं घातली होती बंदीबंदीनंतरही अनेकांकडून टिकटॉकचा वापर, अहवालातून बाब उघड

२९ जून २०२० रोजी सुरक्षेच्या कारणास्तव शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म TikTok ला भारतात बॅन करण्यात आलं. परंतु आजही असे अनेक जण आहेत जे या अॅपचा सर्रास वापर करताना दिसतात. सिमिलस बेवकडून यासंदर्भात एक डेटा जारी करण्यात आला आहे. यातच याबाबतची माहितीही मिळाली आहे. हे एक ऑनलाईन वेब पोर्टल आहे जे वेब अॅनालिटिक्स सर्व्हिस प्रदान करतं.

'डिजिटल ट्रेंड्स' नावाच्या एका अहवालात त्यांनी सांगितलं की डिसेंबर २०२० मध्ये सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या तुलनेत टिकटॉकवर अधिक भारतीय युझर्स अॅक्टिव्ह होते. गेल्या वर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्च ते जूनदरम्यान लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये टिकटॉकच्या युझर्समध्ये वाढ दिसून आली. परंतु जुलै नंतर यात घट होत गेली, असंही यात नमूद करण्यात आलं आहे. मनी कंट्रोलनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे टिकटॉक हे अॅप बॅन केलं असलं तर ऑगस्ट आणि ऑक्टोबरदरम्यान महिन्याच्या अॅक्टिव्ह युझर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली. बंदी नंतरही अनेक जणांकडून याचा वापर कसा केला जातो हा महत्त्वाचा प्रश्न आहे.  

"तात्काळ बंदी हे नव्यानं अॅप इन्स्टॉल करण्यावर होती. याचा अर्थ असा की युझर्सना नव्यानं टिकटॉक हे अॅप डाऊनलोड करता येणार नव्हतं. जर एखाद्या व्यक्तीनं हे अॅप जरी डिलीट केलं असेल तरी त्याला ते पुन्हा इन्स्टॉल करता येणार नाही. परंतु ज्यांच्याकडे पूर्वीपासून मोबाईलमध्ये हे अॅप आहे ते आताही या अॅपचा वापर करू शकतात," अशी माहिती बेक्सले अॅडव्हाझर्सचे कार्यकारी अध्यक्ष उत्कर्ष सिन्हा यांनी सांगितलं.

"टिकटॉक जरी बॅन असलं तरी यावर सातत्यानं अॅक्टिव असणारे लोक ते अॅप डाऊनलोड करण्यासाठी अन्य मार्गांचा वापर करत आहेत. या अॅपची .apk फाईल ही अन्य वेबसाईटवरूनही डाऊनलोड केली जाऊ शकते," अशी माहिची डिजिटल ऑडिओ प्लॅटफॉर्म खबरीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित शर्मा यांनी दिली. याव्यतिरिक्त याचा वापर करण्यासाठी VPN चा वापर करणंदेखील शक्य आहे. याद्वारे कोणताही युझर बॅन असतानादेखील ते कंटेंट सहरित्या अॅक्सेस करू शकत असल्याची माहिती सायबर वकिल जोनिस वर्गिस यांनी सांगितलं. "पूर्वीच्या तुलनेत आता अनेकांना VPN ची माहिती आहे. ते सेट करणारे अनेक अॅप्स आज मोफतही मिळतात. याद्वारे त्या साईटपर्यंत पोहोचणं शक्य आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

"'आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कंटेंटचं चांगलं नाव आहे. टिकटॉक हा एक ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे. भारताच्या बाहेर दुबई, नेपाळ, श्रीलंकेसारख्या देशांमध्येही हा अतिशय लोकप्रिय आहे. या ठिकाणी लोकांना भारतीय कंटेंट अधिक आवडतो. एवढंच काय तर बॅन झाल्यानंतरही अॅपचा वापर करू शकत नसले तरी अनेक फेमस लोकांचं फॉलोअर्सही वाढले आहेत," अशी माहिती एमएडी इन्फ्ल्यूएन्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम माधवन यांनी दिली. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Explained How TikTok has users in India despite the ban how they using social media app tiktok

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.