कन्हय्या प्रकरणात दिल्ली सरकार घेतेय तज्ज्ञांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 05:58 IST2019-01-25T05:58:53+5:302019-01-25T05:58:59+5:30
जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हय्या कुमारविरुद्ध खटला चालविण्यास मंजुरी द्यावी की, नाही? याबाबत सरकारचा कायदा विभाग विचार करीत आहे, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिली.

कन्हय्या प्रकरणात दिल्ली सरकार घेतेय तज्ज्ञांचा सल्ला
नवी दिल्ली : जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हय्या कुमारविरुद्ध खटला चालविण्यास मंजुरी द्यावी की, नाही? याबाबत सरकारचा कायदा विभाग विचार करीत आहे, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिली. तथापि, दिल्ली सरकारच्या कामात अडथळा आणून केंद्र सरकार देशद्रोह करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
केजरीवाल म्हणाले की, मोदी यांनी दिल्लीतील शाळा रोखल्या, हॉस्पिटल रोखले, सीसीटीव्ही कॅमेरे रोखले, मोहल्ला क्लिनिक रोखले, दिल्लीला ठप्प करण्याचा प्रयत्न केला. हा देशद्रोह नाही काय? जेएनयू प्रकरणात दिल्ली सरकार कायदेशीर सल्ला घेत आहे. अधिकाऱ्यांकडून मंजुरी घेण्यापूर्वीच कन्हय्या कुमार व अन्य ९ जणांविरुद्ध देशद्रोहाच्या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्याप्रकरणी न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.