शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

Exit Poll Karnataka 2023 : कर्नाटकात कोणाची सत्ता येणार, काँग्रेस-भाजपमध्ये ‘काँटे की टक्कर’, जेडीएस ठरणार किंगमेकर?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 7:21 PM

१३ मे रोजी मतमोजणी पार पडणार असून राज्यातील निवडणुकांचे एक्झिट पोल आता समोर आले आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील २२४ जागांसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. उमेदवारांचं भवितव्य आता मतपेटीत बंद झालं आहे. या जागांसाठी मतदान संपलं असून आता १३ मे रोजी निकाल लागणार आहेत. दरम्यान, आता एक्झिट पोल समोर आले असून काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर होणार असल्याचं दिसून येतंय. तर दुसरीकडे जेडीएस किंगमेकर ठरण्याचीही शक्यता आहे.  

झी आणि मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यांना १०३-११८ जागा, तर भाजपला ७९-९४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर एक्झिट पोलनुसार जेडीएसला २५-३३ जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय अन्यच्या खात्याता २ ते ५ जागा जाऊ शकतात.

रिपब्लिक टीव्ही आणि पी पार्कद्वारे कर्नाटकात त्रिशंकू स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज बांधण्यात आलाय. यामध्ये सत्ताधारी भाजपला ८५-१००, काँग्रेसला ९४-१०८ आणि जेडीएसला २४-३२ जागा आणि अन्यच्या खात्याता २ ते ६ जागा जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

टीव्ही ९ पोल काय म्हणतो?

टीव्ही ९ च्या एक्झिट पोलनुसार राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होऊ शकते अशा शक्यता वर्तवण्यात आल्यात. टीव्ही ९ नुसार भाजपला ८८ ते ९८ जागा, काँग्रेसला ९९ चे १०९ जागा आणि जेडीएसच्या खात्यात २१-२६ जागा जातील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. 

तर पोलस्ट्रॅटच्या अंदाजानुसार राज्यात भाजपला ८८-९८, काँग्रेसला ९९ ते १०९ जागा मिळू शकतात असं म्हटलंय. तर जेडीएसच्या खात्यात २१ ते २६ जागा जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.काय म्हणतो सी-वोटर्सचा सर्व्हे?सी वोटर्सनुसार कर्नाटकात भाजपला ८३ ते ९५ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर काँग्रेसला १००-११२, जेडीएसला २१-२९ आणि अन्यना २ ते ६ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. 

तर जन की बातच्या सर्वेक्षणानुसार कर्नाटकात भाजपला ९४-११७, काँग्रेसला ९१-१०६, जेडीएसला १४-२४ आणि अन्यना ०-२ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दर ५ वर्षांनी सत्ताबदल

कर्नाटकात सत्तेत असलेल्या भाजपला कर्नाटकात दर ५ वर्षांनी सत्ता बदलण्याचा ३८ वर्षांचा ट्रेंड तोडायचा आहे. तर दुसरीकडे काँग्रेस यावेळी पुन्हा सत्तेत येईल असा दावा करत आहे. २०१८ प्रमाणे आपण किंगमेकर ठरू शकतो अशी जेडीएसला अपेक्षा आहे. त्यामुळे आता निकाल काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.कोणाला कधी आणि किती जागा?१९९९ च्या निवडणुकीत भाजपला ४४, तर काँग्रेसला १३२ आणि जेडीएसला १० जागा मिळाल्या होत्या. तर २००४ आणि २००८ च्या निवडणुकांत भाजप मोठा पक्ष ठरला होता. २००४ मध्ये भाजपला कर्नाटकात ७९, काँग्रेसला ६५ आणि जेडीएसला ५८ जागा, आणि २००८ मध्ये काँग्रेसला ८०, भाजपला ११० आणि जेडीएसला २८ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. २०१३ मध्ये पुन्हा काँग्रेसनं मुसंडी मारली होती. या निवडणुकांत काँग्रेसला १२२ जागा मिळाल्या होत्या. तर जेडीएस आणि भाजपला ४०-४० जागा मिळाल्या होत्या. २०१८ च्या निवडणुकांमध्ये भाजपला १०४, काँग्रेसला ७८ आणि जेडीएसला ३७ जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणी