शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

कमांडर खालीदला टिपले, काश्मिरात चार अतिरेक्यांचा केला खात्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 1:15 AM

काश्मिरात विमानतळाजवळ सीमा सुरक्षा दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि जैश-ए-मोहम्मदचा कमांडर खालीद ऊर्फ शाहीद शौकत याला सुरक्षा दलाने सोमवारी एका चकमकीत ठार मारले.

श्रीनगर : काश्मिरात विमानतळाजवळ सीमा सुरक्षा दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि जैश-ए-मोहम्मदचा कमांडर खालीद ऊर्फ शाहीद शौकत याला सुरक्षा दलाने सोमवारी एका चकमकीत ठार मारले. याशिवाय शोपियात झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांचा खात्मा केला. बारामुल्ला जिल्ह्याच्या लादुरा भागात अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर या भागाला घेरण्यात आले. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांच्या दिशेने गोळी चालविण्यात आल्यानंतर चकमक सुरू झाली. यावेळी जैश-ए-मोहम्मदचा अतिरेकी खालीद हा ठार झाला. शोपिया जिल्ह्यात केल्लर भागात सुरक्षा दलाने एका चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनच्या तीन अतिरेक्यांना ठार मारले. यात हिज्बुलचा म्होरक्या जाहीदसह इरफान आणि आसिफ यांचा समावेश आहे.रोज होतो पाच ते सहा दहशतवाद्यांचा खात्माभारतीय जवान रोज पाच ते सहा दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत, असा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे केला. पाकिस्तानने गोळीबार केल्यास त्यांना योग्य ते उत्तर द्या, असे आदेश त्यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आपण स्वत:हून पाकिस्तानच्या दिशेने गोळीबार करायचा नाही, मात्र तेथून गोळीबार झाला, तर त्यांना जोरात प्रत्युत्तर द्यायचे, असे जवानांना आदेश आहेत.

टॅग्स :TerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू काश्मिर