कमांडर खालीदला टिपले, काश्मिरात चार अतिरेक्यांचा केला खात्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:16 IST2017-10-10T01:15:51+5:302017-10-10T01:16:36+5:30

काश्मिरात विमानतळाजवळ सीमा सुरक्षा दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि जैश-ए-मोहम्मदचा कमांडर खालीद ऊर्फ शाहीद शौकत याला सुरक्षा दलाने सोमवारी एका चकमकीत ठार मारले.

Exclusive: Four terrorists killed in Kashmir | कमांडर खालीदला टिपले, काश्मिरात चार अतिरेक्यांचा केला खात्मा

कमांडर खालीदला टिपले, काश्मिरात चार अतिरेक्यांचा केला खात्मा

श्रीनगर : काश्मिरात विमानतळाजवळ सीमा सुरक्षा दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि जैश-ए-मोहम्मदचा कमांडर खालीद ऊर्फ शाहीद शौकत याला सुरक्षा दलाने सोमवारी एका चकमकीत ठार मारले. याशिवाय शोपियात झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांचा खात्मा केला. बारामुल्ला जिल्ह्याच्या लादुरा भागात अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर या भागाला घेरण्यात आले. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांच्या दिशेने गोळी चालविण्यात आल्यानंतर चकमक सुरू झाली. यावेळी जैश-ए-मोहम्मदचा अतिरेकी खालीद हा ठार झाला. शोपिया जिल्ह्यात केल्लर भागात सुरक्षा दलाने एका चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनच्या तीन अतिरेक्यांना ठार मारले. यात हिज्बुलचा म्होरक्या जाहीदसह इरफान आणि आसिफ यांचा समावेश आहे.
रोज होतो पाच ते सहा दहशतवाद्यांचा खात्मा
भारतीय जवान रोज पाच ते सहा दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत, असा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे केला. पाकिस्तानने गोळीबार केल्यास त्यांना योग्य ते उत्तर द्या, असे आदेश त्यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आपण स्वत:हून पाकिस्तानच्या दिशेने गोळीबार करायचा नाही, मात्र तेथून गोळीबार झाला, तर त्यांना जोरात प्रत्युत्तर द्यायचे, असे जवानांना आदेश आहेत.

Web Title: Exclusive: Four terrorists killed in Kashmir