सरकारी जमिनीवर शेतीसाठी सुरू होतं खोदकाम, सापडला मौल्यवान खजिना, पाहणारे अवाक्, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 18:55 IST2023-03-30T18:49:44+5:302023-03-30T18:55:45+5:30
Jara Hatke News: छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील पोडी येथे सरकारी जमिनीवर शेतीसाठी खोदकाम सुरू होतं. त्यावेळी या वस्तू सापडल्या.

सरकारी जमिनीवर शेतीसाठी सुरू होतं खोदकाम, सापडला मौल्यवान खजिना, पाहणारे अवाक्, त्यानंतर...
छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील पोडी येथे सरकारी जमिनीवर शेतीसाठी खोदकाम सुरू होतं. त्यावेळी कलचुरी काळातील प्राचीन मूर्ती सापडल्या. अचानक मूर्ती सापडल्याने ग्रामस्थांनी खोदकाम थांबवले. आता मूर्तींना पाहून ग्रामस्थांनी खोदकाम थांबवलं. आता या मूर्तींचा अभ्यास करण्यासाठी टीम पोडी येथे येणार आहे. जिह्ला पुरातत्त्व अधिकारी डीएस ध्रुव यांनी सांगितले की, पोडी येथे खोदकामादरम्यान, प्राचीन काळातील मूर्ती मिळाल्याची माहिती सोमवारी रात्री मिळाली. त्याची सूचना रायपूर येथील मुख्यालयाला देण्यात आली आहे. आता तपासासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तेथून टीम तपास करण्यासाठी पोडी येथे येणार आहे.
या गावातील रहिवासी असलेल्या एका शिक्षकाने सोमवारी सरकारी जमिनीवर शेतीसाठी जेसीबीद्वारे खोदकामाला सुरुवात केली होती. त्यादरम्यान, जमिनीतून आमलक, नंदी, उपासक, राजपुरुष, स्थापत्य खंड, योनिपीठ, परनाला असलेल्या मूर्ती सापडल्या आहेत. त्या पाहून ग्रामस्थांनी खोदकाम थांबवले. या मूर्ती पाहून ग्रामस्थांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
प्राचीन मूर्तींना पाहून या मूर्तींची निर्मिती ही स्थानिक दगडांपासून केली गेली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. स्थापत्य कलेनुसार या मूर्ती कलचुरू काळाच्या उत्तरार्धातील असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच या मूर्ती म्हणजे शिवमंदिराचे अवशेष आहेत. कलचुरी शैवधर्माला मानतात. १२ ते १६व्या शतकापर्यंतचा काळ हा कलचुरी राजवंशातील न उलगडलेला इतिहास मानला जातो.