दुसऱ्याच्या जागी दिली परीक्षा, आयएएस अधिकारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 05:49 IST2024-04-08T05:48:44+5:302024-04-08T05:49:50+5:30
हिमाचल प्रदेश सरकारने केली कारवाई

दुसऱ्याच्या जागी दिली परीक्षा, आयएएस अधिकारी निलंबित
शिमला : दुसऱ्याच्या जागी परीक्षा देताना पकडले गेल्याप्रक़रणी हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस सरकारने आयएएस अधिकारी नवीन तन्वर याला निलंबित केले आहे. त्याला ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. नवीन २०१९ च्या बॅचचा आयएएस अधिकारी आहे. सध्या तो चंबाचा एडीसी म्हणून तैनात होता.
नेमके काय झाले होते?
n१३ डिसेंबर २०२१४ रोजी उत्तर प्रदेशातील नोएडा येथील नवीन तन्वर हा गाझियाबाद येथील गोविंदपुरम येथे लिपिक भरती परीक्षेला बसण्यासाठी आला होता. ही परीक्षा आयबीपीएस क्लर्क भरतीसाठी होती.
nसीबीआयने अमित सिंगच्या जागी पेपर देताना नवीनला अटक केली होती. निलंबित झाल्यानंतर त्याची शिमला सचिवालयातील मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. त्याला कार्मिक विभागात रिपोर्ट करण्यास सांगितले आहे.