EVM हॅकिंग : निवडणूक आयोगाने सय्यद शुजाविरोधात पोलिसांत दाखल केली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 13:34 IST2019-01-22T19:37:07+5:302019-01-24T13:34:39+5:30

केंद्रीय निवडणूक आयोगाने हॅकर सय्यद शुजाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

EVM hacking: The Election Commission has filed complaint against Sayyed Shuja | EVM हॅकिंग : निवडणूक आयोगाने सय्यद शुजाविरोधात पोलिसांत दाखल केली तक्रार

EVM हॅकिंग : निवडणूक आयोगाने सय्यद शुजाविरोधात पोलिसांत दाखल केली तक्रार

नवी दिल्ली - लंडनमधील हॅकेथॉनमध्ये सय्यद सुजा नामक हॅकरने EVM हॅकिंगबाबत केलेल्या दाव्यांमुळे देशात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली असून, हॅकर सय्यद शुजाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरण्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तांमधून सय्यद शुजा याने आपण भारतात वापरण्यात येणाऱ्या EVM बनवणाऱ्या टीमचा सदस्य असल्याचा आणि आपल्याल EVM हॅक करता येत असल्याचा दावा केला होता. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी, असे निवडणूक आयोगाने आपल्या पत्रात म्हटले आहे. 





 दरम्यान,  भारतीय निवडणूक आयोगाने सय्यद शुजा या हॅकरने केलेला दावा कालच फेटाळून लावला होता.  निवडणूक आयोग या प्रकरणात पडू इच्छित नाही. भारतातील EVM सुरक्षित आहेत, त्यांमध्ये छेडछाड होऊ शकत नाही, या दाव्यावर आम्ही कायम आहोत, असे निवडणूक आयोगाने म्हटले होते. 



 

Web Title: EVM hacking: The Election Commission has filed complaint against Sayyed Shuja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.