शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विवाह झाला असला तरी त्यामुळे पतीचा पत्नीवर मालकी हक्क प्रस्थापित होत नाही: उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 14:29 IST

आरोपीवर एका प्रकरणात दाखल झालेला फौजदारी गुन्हा रद्द करण्यासही न्यायालयाने नकार दिला.

प्रयागराज: विवाह झाला असला तरी त्यामुळे पतीचा पत्नीवर मालकी हक्क प्रस्थापित होत नाही तसेच तिला नियंत्रणात ठेवण्याचाही त्याला अधिकार नसल्याचे उत्तर प्रदेशातील अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुकतेच म्हटले आहे. पत्नीचा खासगीपणाचा तसेच स्वायत्ततेचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे या न्यायालयाने एका प्रकरणी निकाल देताना सांगितले. आरोपीवर एका प्रकरणात दाखल झालेला फौजदारी गुन्हा रद्द करण्यासही न्यायालयाने नकार दिला.

पत्नीसोबत व्यतीत नाजूक क्षणांचे व्हिडीओ पतीने सोशल मीडियावर शेअर केले. याप्रकरणी दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यास न्यायमूर्ती विनोद दिवाकर यांनी नकार दिला. विवाह या गोष्टीचे पावित्र्य पतीने नष्ट केले. त्याने व्हिडीओ प्रसारित करून पत्नीचा विश्वासघात केला. पत्नीचा विश्वास त्याने मोडला. हा गंभीर गुन्हा आहे, असे कोर्टाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

परस्पर विश्वास हवा

न्यायालयाने म्हटले आहे की, पती व पत्नी या दोघांच्या हक्कांचे रक्षण होण्यासाठी परस्पर विश्वास खूप महत्त्वाचा असतो. नेमका हा विश्वास तोडण्याचे काम पती प्रद्युन्म यादव याने केले. पत्नीलाही तिचे अधिकार, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते हे पतीने लक्षात घेतले पाहिजे.मीरपूर येथील एक व्यक्ती याप्रकरणी आरोपी असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. तिला कल्पना नसताना, तिची परवानगी न घेता प्रद्युन्म याने फेसबुकवर वादग्रस्त व्हिडीओ अपलोड केला.

पती-पत्नीमधील वाद समझोत्याने सुटेल

पतीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, माहिती कायद्याच्या कलम ६७ च्या आधारे दाखल केलेल्या गुन्ह्यांत पती प्रद्युन्म यादववर कोणताही आरोप सिद्ध होण्याची शक्यता नाही. हा पती-पत्नीमध्ये समझोता होऊन हे प्रकरण मिटण्याची शक्यताही वकिलांनी व्यक्त केली.मात्र, सरकारी वकिलांनी सांगितले की, तक्रारदार महिलेचा आरोपी हा पती असला तरी त्याच्या हातून गंभीर गुन्हा घडला आहे.

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारCourtन्यायालय