शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

असे उदगार तर शत्रू राष्ट्रही काढत नाही, मोदींबाबतच्या त्या विधानावरून भाजपाचा राहुल गांधीवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 16:35 IST

राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांना सरेंडर मोदी अशी उपमा दिल्याने भाजपाचा तीळपापड झाला आहे.

ठळक मुद्देजपान टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेला एक लेख शेअर करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना सरेंडर मोदी अशी उपमा दिली होतीराहुल गांधींचे हे विधान लाजिरवाणे असून, राहुल गांधी जी भाषा बोलत आहेत, तशी भाषा शत्रूराष्ट्राचे नेतेही वापरत नाहीत, असा टोला भाजपाने लगावला राहुल गांधी हे मर्यादांचे उल्लंघन करत आहेत. ते देशाचा अपमान करत आहेत. ही बाब देशाची जनता खपवून घेणार नाही

नवी दिल्ली - एकीकडे लडाखमध्ये चीनची घुसखोरी आणि चिनी सैनिकांसोबतच्या झटापटीत २० जवानांना वीरमरण आल्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे राजधानीमध्ये चीनच्या घुसखोरीवरून सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये दररोज आरोप प्रत्यारोपांचे नवनवे अंक सादर होत आहेत. आज राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांना सरेंडर मोदी अशी उपमा दिल्याने भाजपाचा तीळपापड झाला आहे. राहुल गांधींचे हे विधान लाजिरवाणे असून, राहुल गांधी जी भाषा बोलत आहेत, तशी भाषा शत्रूराष्ट्राचे नेतेही वापरत नाहीत, असा टोला भाजपाने लगावला आहे.

जपान टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेला एक लेख शेअर करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना सरेंडर मोदी अशी उपमा दिली होती.  त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. ‘’राहुल गांधी हे मर्यादांचे उल्लंघन करत आहेत. ते देशाचा अपमान करत आहेत. ही बाब देशाची जनता खपवून घेणार नाही. राहुल गांधी ज्या प्रकारची भाषा बोलत आहेत. तशी भाषा शत्रू राष्ट्रांचे नेतेसुद्धा बोलू शकत नाही. भारत आणि चीन यांच्यात तणाव निर्माण झाल्यापासून राहुल गांधी दररोज पंतप्रधानांचा अवमान करत आहेत. तसेच ते ज्या प्रकारची भाषा वापरत आहेत, त्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे. अन्यथा देशातील जनता काँग्रेसला कधी माफ करणार नाही.’’ असे शाहनवाझ हुसेन यांनी सांगितले.  

दरम्यान, राहुल गांधींच्या आक्रमक टीकेनंतर भाजपाचे अनेक नेते त्यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. आसाम सरकारमध्ये मंत्री असलेल्या हेमंत बिस्वा शर्मा यांनीही राहुल गांधींनी टोला लगावला आहे. राहुल गांधी, तुम्ही एवढे निराश झाला आहात की, तुम्हाला व्यवस्थित लिहिताही येत नाही आहे. आत्मसमर्पण करणे हा गांधी-नेहरू परिवाराचा हॉलमार्क आहे. १९६२ मध्ये पंडित नेहरू यांनी आसाम चीनला जवळपास देऊनच टाकला होता. जेव्हा चीनने बोमडिलावर कब्जा केला तेव्हा माझे हृदय आसामी लोकांसाठी रडत आहे, असे नेहरूंनी म्हटले होते, असा आरोप हेमंत बिस्वा शर्मा यांनी केला.

  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन 

टॅग्स :IndiaभारतRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण