वांशिक संघर्ष : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी; भूतकाळातील चुका विसरण्याचे केले आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 06:54 IST2025-01-01T06:52:33+5:302025-01-01T06:54:10+5:30
सर्वांनी भूतकाळातल्या चुका विसराव्यात, चुकीचे वागलेल्यांना माफ करावे व शांतता प्रस्थापित करण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही बीरेन सिंह यांनी केले आहे.

वांशिक संघर्ष : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी; भूतकाळातील चुका विसरण्याचे केले आवाहन
इम्फाळ : गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून झालेल्या वांशिक संघर्षाबद्दल मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी मंगळवारी सर्व समुदायांची माफी मागितली आहे. या संघर्षात आतापर्यंत २५० हून अधिक लोकांचा बळी गेला आणि हजारो बेघर झाले. सर्वांनी भूतकाळातल्या चुका विसराव्यात, चुकीचे वागलेल्यांना माफ करावे व शांतता प्रस्थापित करण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
महिला निदर्शकांची सुरक्षा दलाशी चकमक
मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात मंगळवारी कुकी-झो महिलांच्या नेतृत्वात निदर्शने करणाऱ्यांची सुरक्षा दलाशी मंगळवारी चकमक झाली. जमावाने सुरक्षा जवानांचे कडे भेदण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा प्रकार घडला, असे पोलिसांनी म्हटले. सुरक्षा दलाने जमावाला पांगविले. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र चकमकीत अनेक जण जखमी झाले.