शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

देशात २६५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 22:00 IST

उत्पादन घटूनही ६० लाख टन साखर राहणार शिल्लक

ठळक मुद्देउसाची उपलब्धता कमी असल्याने देशभरातील ४५३ कारखाने झाले होते सुरू गेल्या हंगामामध्ये देशात ३३१ लाख टन साखर उत्पादित

पुणे : देशात आत्तापर्यंत २१० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, हंगामाच्या अखेरीस २६५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशांतर्गत उत्पादन ६४ लाख टनांनी घटणार आहे. मात्र, गेल्या दोन हंगामांत झालेल्या विक्रमी साखर उत्पादनामुळे ५५ ते ६० लाख टन साखर शिल्लक राहील, असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून व्यक्त करण्यात येत आहे.उसाची उपलब्धता कमी असल्याने देशभरातील ४५३ कारखाने सुरू झाले होते. गेल्या वर्षी ५२० कारखाने गाळप हंगामामध्ये सहभागी झाले होते. तर, गेल्या हंगामामध्ये देशात ३३१ लाख टन साखर उत्पादित झाली. यंदा १३ मार्चअखेरीस २१० लाख टन साखर उत्पादित झाली असून, गतवर्षीपेक्षा उत्पादन ५७ लाख टनांनी घटले आहे.उत्तर प्रदेशाने ८३ लाख टन साखरेचे उत्पादन करून पुन्हा आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रात ५५ लाख टन साखर उत्पादित झाली असून, गतवर्षीपेक्षा उत्पादनामधे ४३ लाख टनांनी घट आहे. कर्नाटकामधे ३३ लाख टन साखर उत्पादन झाले असून, तेथे ९ लाख टनांनी उत्पादन घटले आहे. गुजरातमध्ये ८ लाख टन साखर उत्पादन झाले असून, त्यातही गतवर्षीच्या तुलनेत अडीच लाख टनांनी घट असल्याचे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले.देशातील उत्पादनाची स्थिती पाहता, यंदा २६५ लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज आहे. त्यात उत्तर प्रदेश ११८, महाराष्ट्र ६०, कर्नाटक ३४ आणि गुजरातमधे ९ लाख टन उत्पादन होईल. यंदा हंगामाच्या सुरुवातीला तब्बल १४५ लाख टन साखर शिल्लकी होती. राखीव साठा योजनेमधील ४० लाख टन व अपेक्षित ५० लाख टनांची निर्यात लक्षात घेता, हंगामाच्या अखेरीस ५५ ते ६० लाख टन साखर शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साखरेचे आंतरराष्ट्रीय दर कोसळले आहेत. या संकटामुळे निर्यातीमधे घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे......................साखर निर्यातीवर कोरोनाचा प्रभावसाखरेचे स्थानिक बाजारातील दर टिकून राहण्यासाठी किमान ५० लाख टन साखरेची निर्यात होणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत ३५ लाख टन निर्यातीचे करार झाले असून, त्यातील २२-२३ लाख टन साखर निर्यात झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्यातीवर परिणाम होण्याची भीती आहे.  

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती