An estimated 5,3,2 students traveled from India to the United States for education | शिक्षणासाठी भारतातून अमेरिकेत गेले तब्बल २,०२,०१४ विद्यार्थी

शिक्षणासाठी भारतातून अमेरिकेत गेले तब्बल २,०२,०१४ विद्यार्थी

वॉशिंग्टन : २०१८-१९ या वर्षात भारतातून २,०२,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेले आहेत. अमेरिकेत शिक्षण घेणाºया आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा विचार केल्यास भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागला आहे. सलग दहाव्या वर्षी चीन हा अमेरिकेत सर्वाधिक विद्यार्थी पाठविणारा देश ठरला आहे.

‘आंतरराष्ट्रीय विद्यार्थी देवाण-घेवाण’ या विषयावरील ‘२०१९ ओपन डुअर्स रिपोर्ट’ नावाचा एक अहवाल सोमवारी जारी करण्यात आला. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या सार्वकालिक उच्चांकावर गेल्याचे दिसून आले आहे. याशिवाय सलग चौथ्या वर्षी १० लाखांपेक्षा जास्त विदेशी विद्यार्थी आपापल्या देशांतून अमेरिकेत शिक्षणासाठी आले आहेत.

अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला ४४.७ अब्ज डॉलरचे मोठे योगदान दिले आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत हा आकडा ५.५ टक्क्यांनी अधिक आहे. अमेरिकेत शिक्षण घेणाºया आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांत भारत आणि चीन या दोन देशांच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण एकूण विद्यार्थ्यांच्या ५० टक्क्यांपेक्षाही अधिक आहे.
२०१८-१९ मध्ये चीनचे ३,६९,५४८ विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. भारतीय विद्यार्थ्यांची संख्या २,०२,०१४ आहे. अमेरिकेत शिक्षण घेणाºया एकूण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या १०,९५,२९९ असून मागील वर्षाच्या तुलनेत ती ०.०५ टक्क्याने जास्त आहे. अमेरिकेत उच्चशिक्षण घेणाºया एकूण विद्यार्थ्यांत विदेशी विद्यार्थ्यांचे प्रमाण ५.५ टक्के आहे. (वृत्तसंस्था)

अमेरिकेचे विद्यार्थी विदेशांत मोठ्या संख्येने
‘इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन’ (आयआयई) आणि अमेरिकेच्या डिपार्टमेंट आॅफ स्टेट्स ब्युरो आॅफ एज्युकेशन अँड कल्चरल अफेयर्स’ यांनी संयुक्तरीत्या हा अहवाल जारी केला आहे. अमेरिकेच्या शिक्षण व संस्कृती व्यवहार विभागाच्या सहायकमंत्री मेरी रॉयस यांनी सांगितले की, अमेरिकेत शिक्षण घेणाºया आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे, तसेच अमेरिकेचे विद्यार्थीही मोठ्या संख्येने विदेशात शिक्षण घेत आहेत. याचा आम्हाला आनंदच आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: An estimated 5,3,2 students traveled from India to the United States for education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.