कंपनीने पीएफ न भरल्यास आता मेसेज आणि ई-मेल येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 10:29 AM2018-04-26T10:29:31+5:302018-04-26T10:29:31+5:30

कर्मचारी भविष्य निधी संघटना (इपीएफओ) आता एसएमएस आणि ई-मेलद्वारे अलर्ट देणार आहेत.

epfo to send sms and email to its members if pf contribution not deposited | कंपनीने पीएफ न भरल्यास आता मेसेज आणि ई-मेल येणार

कंपनीने पीएफ न भरल्यास आता मेसेज आणि ई-मेल येणार

googlenewsNext

नवी दिल्ली- तुमच्या कंपनीने तुमच्या पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता एसएमएस व ईमेलवर मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना (इपीएफओ) आता एसएमएस आणि ई-मेलद्वारे अलर्ट देणार आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफची रक्कम कापूनही पीएफ जमा न करणाऱ्यांना चाप बसणार आहे. 

इपीएफओने सदस्यांसाठी खास सुविधा सुरू केली आहे. एखाद्या कंपनीने कर्मचाऱ्यांचा पीएफ जमा केला नाही, कर इपीएफओ त्या कर्मचाऱ्यांना मेसेज आणि मेलकरून माहिती देण्याची तरतूद या सुविधेमध्ये आहे. पण या सुविधेसाठी कर्मचाऱ्याचा मोबाइल नंबर आणि इमेल आयडी त्याच्या युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) बरोबर लिंक होणं गरजेचं आहे. 

कामगार मंत्रालयाने याविषयी म्हटलं की, इपीएफओने सदस्यांसाठी सुरू केलेल्या नव्या सुविधेतून त्यांना त्यांच्या खात्यातील पीएफच्या रक्कमेची माहिती एका एसएमएसवर किंवा मिस्ड कॉलवर मिळणार आहे. याशिवाय सदस्य इ-पासबुकही पाहू शकता. ज्यामुळे त्यांना पीएफच्या पैशांबद्दल माहिती मिळेल. 

काही कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफचे पैसे कापतात पण ते अकाऊंटमध्ये जमा करत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. आता इपीएफओने त्या कंपन्यांना नोटीसी बजावल्या आहेत. 

Web Title: epfo to send sms and email to its members if pf contribution not deposited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.