शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

राखमिश्रित कोळशामुळे पर्यावरणाची हानी

By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST

हरित लवादात अर्ज : केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाला फटकारले

हरित लवादात अर्ज : केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाला फटकारले

नागपूर : वीज निर्मितीसाठी राखमिश्रित कोळसा वापरण्यात येत असल्यामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. यावरून राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे खंडपीठाने केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाला कडक शब्दांत फटकारले आहे.
यासंदर्भात महादुला येथील सामजिक कार्यकर्ते रत्नदीप रंगारी यांनी लवादात अर्ज दाखल केला आहे. न्यायमूर्ती व्ही. आर. किनगावकर व तज्ज्ञ सदस्य डॉ. अजय देशपांडे यांनी अर्जावर सुनावणी केल्यानंतर शासनाला फटकारतानाच विविध महत्त्वाचे आदेशही दिले आहेत. त्यानुसार खाणीतून काढल्यानंतर कोळशाचा दर्जा कसा असतो, वाहतुकीदरम्यान कोळसा बदलविण्यात येतो काय आणि या गैरव्यवहारासाठी कुणावर जबाबदारी निश्चित करता येईल, यासंदर्भात शासनाला २० फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करायचा आहे.
केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कार्य करावे. तसेच, खाणीतून कोळसा निघाल्यानंतर त्याची गुणवत्ता विविध ठिकाणी कशी बदलते किंवा खाणीमधूनच दर्जाहीन कोळसा काढला जातो काय याची चौकशी करावी, असे लवादाने सांगितले आहे.
खाणीमधून कोळसा काढण्यासाठी, कोळसा वाहतुकीसाठी, कंपन्यांना कोळसा देताना आणि उद्योग व वीज कंपन्यांकडून कोळसा वापरण्यापूर्वी कोणत्या प्रकारची गुणवत्ता नियंत्रण प्रणाली वापरली जाते याची माहिती द्यावी, अशी सूचना करून वीज निर्मिती प्रकल्पांत दर्जाहीन कोळसा वापरला जातोय यासाठी वाहतूकदार, वीज कंपन्या किंवा अन्य संस्था यापैकी कुणाला जबाबदार धरता येईल याचे उत्तर लवादाने मागितले आहे.
केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने २ जानेवारी २०१४ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार वीज निर्मितीसाठी ३४ टक्क्यांपेक्षा जास्त राख असलेला कोळसा वापरण्यास बंदी आहे. परंतु, या नियमाची कुणीच काटेकोर अंमलबजावणी करीत नाही. वीज व कोळसा कंपन्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रदूषणाची पातळी सतत वाढत आहे. पर्यावरण व वन मंत्रालयाने निष्क्रिय भूमिका स्वीकारली आहे, असे अर्जदाराचे म्हणणे आहे. महानिर्मिती कंपनीच्या उच्चाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. आवश्यक असल्यास व्यवस्थापकीय संचालक व मुख्य अभियंता यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात यावा, अशी विनंती अर्जात करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावरही विविध आरोप आहेत.