पैठणमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:41+5:302015-02-14T23:51:41+5:30

पैठण : नगर परिषदेने शनिवारपासून शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. आज नाथ हायस्कूलसमोरील व डॉ. लोंढे रस्त्यावरील बसस्थानकालगतची जवळपास दीडशे अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढण्यात आली. या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली होती. न.प.ने अनेकदा सूचना देऊनही अतिक्रमणधारकांनी अतिक्रमणे काढली नाहीत. नाथषष्ठी यात्रा महोत्सव व शहरातील विकासकामे डोळ्यासमोर ठेवून न.प.ने शनिवारपासून अतिक्रमणे काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. सकाळी १० वाजता प्रभारी मुख्याधिकारी सुधीर शेट्टी अतिक्रमणविरोधी पथकप्रमुख व्यंकटी पापुलवार यांच्या नेतृत्वाखाली उदय पटेल, भगवानराव कावसनकर, कैलास मगरे, शिवाजी पोटे, सुभाष तुसामकर, रऊफ शेख, मुकुंद महाजन, राजेश रांजणीकर, दगडू पगारे, खलील धांडे, राम कांदवणे, मध

Encroachment Removal Campaign in Paithan | पैठणमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम

पैठणमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम

ठण : नगर परिषदेने शनिवारपासून शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. आज नाथ हायस्कूलसमोरील व डॉ. लोंढे रस्त्यावरील बसस्थानकालगतची जवळपास दीडशे अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढण्यात आली. या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली होती. न.प.ने अनेकदा सूचना देऊनही अतिक्रमणधारकांनी अतिक्रमणे काढली नाहीत. नाथषष्ठी यात्रा महोत्सव व शहरातील विकासकामे डोळ्यासमोर ठेवून न.प.ने शनिवारपासून अतिक्रमणे काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. सकाळी १० वाजता प्रभारी मुख्याधिकारी सुधीर शेट्टी अतिक्रमणविरोधी पथकप्रमुख व्यंकटी पापुलवार यांच्या नेतृत्वाखाली उदय पटेल, भगवानराव कावसनकर, कैलास मगरे, शिवाजी पोटे, सुभाष तुसामकर, रऊफ शेख, मुकुंद महाजन, राजेश रांजणीकर, दगडू पगारे, खलील धांडे, राम कांदवणे, मधुकर कांबळे, आश्विन गोजरे यांच्यासह १०० न.प. कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. याप्रसंगी दुकानदारांनी केलेली जवळपास दीडशे कच्ची-पक्की व लहान-मोठी अतिक्रमणे ज्यामध्ये चहाची दुकाने, पानटपर्‍या, हॉटेल, जाहिरात फलके, दर्शनी भागातील बांधलेले सिमेंटे ओटे, जेसीबी यंत्राच्या साह्याने भुईसपाट केली. यामध्ये दुपारी २ वाजेपर्यंत नाथ हायस्कूलसमोरील व बसस्थानकालगत व पाठीमागची सर्वच अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. अतिक्रमण हटाव मोहिमेवेळी पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. जोगदंड, फौजदार अंकुश पाटोळे, संजय सहाणे, तांबोळी, एस.के. पुरी, अंगद तिडके, बी.बी. चव्हाण, दीपाली वाघ, धटिंग, सिराज पठाण, भारत चव्हाण यांच्यासह ५० पोलीस कर्मचारी ताफा तैनात होता. अनेक वर्षांनंतर अशा पद्धतीची सरसकट अतिक्रमण हटाव मोहीम न.प.ने राबविली. त्यामुळे कारवाईला शहरवासीयांचे सहकार्य मिळाले व किरकोळ अपवाद वगळता टोकाचा विरोध झाला नाही. रविवारी ही मोहीम यात्रा मैदान व नाथ मंदिर परिसरात राबविली असल्याची माहिती न.प. सूत्रांनी दिली.

Web Title: Encroachment Removal Campaign in Paithan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.