बारामती शहरातील पदपथावरील अतिक्रमण हटविले
By Admin | Updated: July 15, 2015 23:12 IST2015-07-15T23:12:32+5:302015-07-15T23:12:32+5:30
बारामती : शहरात गुरुवारी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात नगरपालिका प्रशासनाच्या वतीने पालखीमार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.

बारामती शहरातील पदपथावरील अतिक्रमण हटविले
ब रामती : शहरात गुरुवारी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात नगरपालिका प्रशासनाच्या वतीने पालखीमार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी याबाबत अतिक्रमण हटविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी (दि. १४) सकाळपासून ही कारवाई करण्यात आली. पहिल्या टप्प्यात तीन हत्ती चौक ते बसस्थानकदरम्यान असणारे अतिक्रमण हटविण्यात आले. या वेळी फेरी व्यावसायिकांसह पदपथावरील अतिक्रमण हटविण्यात आले. दुपारी दुसर्या टप्प्यात इंदापूर चौक, गुणवडी चौक, शिवाजी चौकदरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. सुनील धुमाळ, संजय प्रभुणे, राजेंद्र सोनवणे, सागर भोसले, किरण भोसले, दादा जोगदंड आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.