शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

पुलवामामध्ये लष्कराची धडाकेबाज कारवाई, तीन दहशतवाद्यांचा खात्मा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 9:04 PM

काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात लष्कराने आक्रमक पवित्रा घेतला असून, शुक्रवारी संध्याकाळी पुलवामा येथे केलेल्या धडाकेबाज कारवाईत लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात लष्कराने आक्रमक पवित्रा घेतला असून, शुक्रवारी संध्याकाळी पुलवामा येथे केलेल्या धडाकेबाज कारवाईत लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. पुलवामामधील छतपोरा भागात लष्कराने या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असून, या कारवाईनंतर परिसरामध्ये मोठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच कारवाईदरम्यान परिसरातील इंटरनेटसेवा खंडित करण्यात आली आहे.  पोलिसांच्या उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुलवामाच्या मुख्य परिसरातील छतपोरा भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर लष्कराच्या 55 राष्ट्रीय रायफल्स, जम्मू काश्मीर पोलिसांचे एसजीओ आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे कारवाईस सुरुवात केली. शोधमोहिमेदरम्यान दहशतवादी एका घरात लपून बसल्याचे आढळले. त्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबारास सुरुवात केली. जवानांनीही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर अतिरिक्त सुरक्षा दलांना तैनात करून मोठ्या कारवाईस सुरुवात करण्यात आली. अखेर  या कारवाईत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. 

टॅग्स :TerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान