Jammu Kashmir : कुलगाम सेक्टरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 11:18 IST2018-09-15T07:54:59+5:302018-09-15T11:18:18+5:30

सीमारेषेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत.

Encounter between terrorists & security forces is underway in Kulgam's Chowgam. 3 terrorists have been killed so far. | Jammu Kashmir : कुलगाम सेक्टरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu Kashmir : कुलगाम सेक्टरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. शनिवारी (15 सप्टेंबर) सकाळी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम सेक्टरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीदरम्यान पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. काजीगुंड भागात एक दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने सध्या परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. 




चकमकीनंतर बारामुल्ला-काजीगुंड भागातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली असून जवानांकडून शोधकार्य सुरू आहे. कडेकोड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (14 सप्टेंबर) रात्री उशिरा ही चकमक सुरू झाली.



 


 

Web Title: Encounter between terrorists & security forces is underway in Kulgam's Chowgam. 3 terrorists have been killed so far.