शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदाराच्या शासकीय निवासस्थानी कर्मचाऱ्याची आत्महत्या; परिसरात खळबळ, तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 10:47 IST

आत्महत्येचे कारण शोधले जात आहे. या घटनेची माहिती मृताच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे.

नवी दिल्ली: भाजपा आमदार योगेश शुक्ला यांच्या हजरतगंज येथील आमदार निवासाच्या फ्लॅट क्रमांक ८०४ मध्ये रविवारी रात्री उशिरा त्यांच्या मीडिया सेलच्या कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले आणि दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढला. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हजरतगंजचे निरीक्षक प्रमोद कुमार पांडे यांनी सांगितले की, बाराबंकी हैदरगढचा रहिवासी २४ वर्षीय श्रेष्ठ तिवारी बीकेटी आमदाराच्या मीडिया सेलमध्ये काम करत असे. रविवारी रात्री तो फ्लॅटमध्ये एकटाच होता. रात्री साडेअकराच्या सुमारास श्रेष्ठ यांनी गळफास लावून घेतला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार अद्याप कोणतीही सुसाईड नोट वगैरे जप्त करण्यात आलेली नाही. आत्महत्येचे कारण शोधले जात आहे. या घटनेची माहिती मृताच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आत्महत्या करण्यापूर्वी श्रेष्ठने ओळखीच्या किंवा नातेवाईकाला फोन करून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. त्याने ज्या व्यक्तीला फोन केला होता त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. यानंतर पोलिसांचे पथक फ्लॅट क्रमांक ८०४ वर पाठवण्यात आले. दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी तो दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता श्रेष्ठ हा लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूBJPभाजपा