शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणी! लोकशाहीच्या संरक्षणासाठी लढणाऱ्यांना विसरणार नाही- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 07:00 IST

मोदी म्हणाले की, १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी केवळ लोकशाहीसाठी मतदान केले होते.

नवी दिल्ली : आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या संरक्षणासाठी झटणा-या लोकांना देश कधीही विसरणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी गौरवोद्गार काढले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी घोषित केली होती. मोदी यांनी टष्ट्वीट केले की, ४५ वर्षांपूर्वी देशावर आणीबाणी थोपविण्यात आली. त्यावेळी लोकशाहीच्या संरक्षणासाठी ज्या लोकांनी संघर्ष केला, यातना सहन केल्या त्या सर्वांना माझे शतशत नमन. त्यांचा त्याग आणि बलिदान देश कधीही विसरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ची जून २०१९ ची एक क्लिपही शेअर केली आहे. यात आणीबाणीचा हवाला देण्यात आला आहे. मोदी म्हणाले की, १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी केवळ लोकशाहीसाठी मतदान केले होते.>‘एका कुटुंबाचे हित राष्ट्रीय हितावर वरचढ’एकाच कुटुंबाचे हित पक्ष आणि राष्ट्रीय हितावर वरचढ ठरत आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्यांनी असा सवाल केला की, आणीबाणीची मानसिकता आजही काँग्रेसमध्ये का आहे? अमित शहा यांनी गुरुवारी एकानंतर एक टष्ट्वीट केले आणि असा दावा केला की, काँग्रेसच्या नेत्यांना आपल्याच पक्षात गुदमरल्यासारखे होत आहे.हा पक्ष जनतेपासून दूर जात आहे. शहा म्हणाले की, ४५ वर्षांपूर्वी एका कुटुंबाच्या सत्तेच्या लालसेने देशावर आणीबाणी थोपली होती. रात्रीतून देश कैदखान्यात रूपांतरित झाला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी