Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 10:21 IST2025-05-25T10:20:22+5:302025-05-25T10:21:12+5:30

Corona Virus : कोरोना व्हायरसमुळे देशाचं पुन्हा एकदा टेन्शन वाढलं आहे. कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री झाली आहे.

emergence of new covid variants detected in india variants of corona virus insacog data latest updates of corona | Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?

Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?

कोरोना व्हायरसमुळे देशाचं पुन्हा एकदा टेन्शन वाढलं आहे. कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री झाली आहे. तामिळनाडू आणि गुजरातमध्ये नवीन व्हेरिएंट आढळून आले आहेत. INSACOG च्या डेटामध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे. तसेच दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत.

कोरोना व्हायरसचे दोन नवीन सबव्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 आहेत. इंडियन SARS-CoV-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) च्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये तामिळनाडूमध्ये NB.1.8.1 चा एक रुग्ण आढळला. तर गुजरातमध्ये मे महिन्यात LF.7 चे चार रुग्ण आढळले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सध्या NB.1.8 आणि LF.7 ला Variants Under Monitoring या कॅटेगरीमध्ये ठेवलं आहे. हे Variants of Concern किंवा Variants of Interest नाही. मात्र चीन आणि आशियातील काही भागांमध्ये कोरोना प्रकरणांच्या वाढीसाठी हे व्हेरिएंट जबाबदार असल्याचं मानलं जातं.

 मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?

INSACOG च्या मते, सध्या भारतात सर्वात प्रचलित व्हेरिएंट JN.1 आहे, जो चाचणी केलेल्या सर्व नमुन्यांपैकी 53 टक्के आहे. त्यानंतर BA.2 (26%) आणि इतर ओमायक्रॉन सबव्हेरिएंट्स (20%) येतात.

तज्ज्ञ काय म्हणतात?

NB.1.8.1 च्या स्पाइक प्रोटीनमध्ये आढळणारे A435S, V445H आणि T478I सारखे म्यूटेशने त्याच्या वेगाने पसरण्याची आणि रोगप्रतिकारक शक्तीपासून वाचण्याची क्षमता दर्शवितात. WHO च्या प्राथमिक जोखीम मूल्यांकन अहवालानुसार, या व्हेरिएंटमुळे सध्या जागतिक स्तरावर सार्वजनिक आरोग्याला कमी धोका आहे.

चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?

सरकारची नजर, तज्ज्ञांची बैठक

आरोग्य सेवा महासंचालक (DGHS) यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली, ज्यामध्ये ICMR, NCDC आणि इतर आरोग्य संस्थांमधील तज्ज्ञांनी परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या तरी कोणताही मोठा धोका नसल्याचं दिसून आलं आहे, परंतु सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 बूस्टर डोस घ्यावा लागेल का? चीन आणि भारतासह ५ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका

केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक यासारख्या राज्यांमधून काही कोरोना रुग्ण आढळल्याचं सांगितले. देशात कोरोना व्हायरससह श्वसनाच्या आजारांवर लक्ष ठेवण्यासाठी IDSP (इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हेलन्स प्रोग्राम) आणि ICMR चं सेंटिनेल सर्व्हेलन्स नेटवर्क सक्रिय आहेत. बहुतेक प्रकरणे सौम्य आहेत आणि रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत.

Web Title: emergence of new covid variants detected in india variants of corona virus insacog data latest updates of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.