वेतनत्रुटी दूर करा, लिपिकवर्गीय संघटनेचे ग्रामविकासमंत्र्यांना साकडे
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:36+5:302015-02-18T00:13:36+5:30
नाशिक : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेले कनिष्ठ सहायक व वरिष्ठ सहायक (लिपीक) कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहायक प्रशासन अधिकारी यांच्या असलेल्या वेतनातील त्रूटी तत्काळ दूर कराव्यात, या मागणीचे निवेदन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांना भेटून जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिले.

वेतनत्रुटी दूर करा, लिपिकवर्गीय संघटनेचे ग्रामविकासमंत्र्यांना साकडे
न शिक : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेले कनिष्ठ सहायक व वरिष्ठ सहायक (लिपीक) कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहायक प्रशासन अधिकारी यांच्या असलेल्या वेतनातील त्रूटी तत्काळ दूर कराव्यात, या मागणीचे निवेदन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांना भेटून जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिले.ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांना भेटून राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी चर्चा केली. यावेळी वेतनत्रुटीबाबत ग्रामविकासमंत्र्यांशी संघटनेच्या पदाधिकार्यांची सविस्तर चर्चा झाली. त्यात लिपिकवर्गीय कर्मचार्यांच्या असलेल्या वेतनत्रुटी दूर करण्याबाबत शासनस्तरावरून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी पदाधिकार्यांना दिले. यावेळी जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी राज्य अध्यक्ष गिरीष दाभाडकर, सचिव बापूसाहेब कुलकर्णी, अरुण दोंदे, प्रमोद निरगुडे, सदाशिव बारगळ, अंबादास पाटील, नितीन मालुसरे, नागरगोजे, सचिन मगर, सागर बाबर, संजय चव्हाण, प्रदीप अहिरे, धनराज भोई, बाळासाहेब टिळे, हेमंत सानप, सी. एल. बैरागी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)