शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

दक्षिणेचे हत्तीही मातृभाषेवर ठाम, माहुतांना करावा लागतोय 'द्राविडी प्राणायाम'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 1:17 PM

हत्तींना केवळ उच्चारशास्त्र आणि हावभावांची भाषा कळते.

झारखंड: दक्षिण भारतातील लोक स्वत:चा प्रांत आणि मातृभाषेच्याबाबत किती कडवट असतात, याचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. मात्र, एका प्रसंगामुळे दक्षिण भारतातील प्राणीही मातृभाषेबाबत किती आग्रही असू शकतात, याचे प्रत्यंतर नुकतेच आले. यामधील मजेचा भाग सोडला तर झारखंडमधील पालमाऊ व्याघ्र अभयारण्यात खरोखरच असा प्रसंग उद्भवला आहे. याठिकाणी काही दिवसांपूर्वी कर्नाटकातून काळभैरव, सीता आणि मृगसेन हे तीन हत्ती आणण्यात आले होते. मात्र, या हत्तींना लहानपणापासून केवळ कानडी भाषेतील सूचना ऐकण्याची सवय असल्यामुळे पालमाऊ व्याघ्र प्रकल्पातील स्थानिक माहुतांची चांगलीच गोची झाली आहे. कर्नाटकमधील बंदीपूर राष्ट्रीय अभयाअरण्यात असणाऱ्या या हत्तींना महिन्याभरापूर्वी झारखंडमध्ये आणण्यात आले होते. मात्र, येथे आणल्यानंतर स्थानिक माहुतांकडून हिंदी भाषेत दिल्या जाणाऱ्या सूचना ऐकून या हत्तींचा गोंधळ उडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भाषेचा हा अडसर दूर करण्यासाठी या हत्तींच्या मूळ माहुतांना कर्नाटकातून पाचारण करण्यात आले आहे. कर्नाटकातील हे माहूत हत्तींच्या नव्या मालकांना कानडी भाषा शिकवत आहेत. त्याचवेळी हत्तींनाही हिंदी भाषा शिकवण्याचा द्राविडी प्राणायाम सध्या पालमाऊ व्याघ्र प्रकल्पात सुरू आहे. जेणेकरून भविष्यात हत्ती आणि माहुतांच्या संभाषणात कोणतेही अडथळे येऊ नयेत. हत्तींना केवळ उच्चारशास्त्र आणि हावभावांची भाषा कळते. साहजिकच हिंदी आणि कानडी भाषेतील उच्चार वेगवेगळे आहेत. त्यामुळे कर्नाटकातून झारखंडमध्ये आणल्यानंतर हत्तींना माहुतांकडून सूचना स्वीकारताना गोंधळल्यासारखे होत आहे. याठिकाणी जंगल सफारीसाठी या हत्तींचा वापर होणार होता. परंतु, हिंदीतील सूचनाच या हत्तींना समजत नसल्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणासाठी अधिक वेळ लागत असल्याची माहिती झारखंड वन्यजीव मंडळाचे सदस्य डॉ. डी.एस. श्रीवास्तव यांनी दिली. सध्या लाल बिहारी व योगेंद्र हे झारखंडमधील माहूत काळभैरव हत्तीचा मूळ माहूत मंजूल याच्याकडून कानडी भाषेचे धडे घेत आहेत. तर सीता आणि मृगसेन या दोन हत्तींना रामप्रसाद व बीरेंद्रकडून प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासाठी या हत्तींचे मूळ माहूत मारी यांची मदत घेतली जात आहे. भाषेचा हा गोंधळ दूर झाल्यानंतर मंजूल आणि मारी कर्नाटकमध्ये परततील, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवKarnatakकर्नाटकhindiहिंदी