शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी मध्यरात्री दुचाकी रोखली; त्यानं ओळख दाखवण्यासाठी थेट परिसराची वीजच कापली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 12:42 IST

आपण वीज विभागाचे कर्मचारी असल्याची ओळख पटवून देण्यासाठी परिसरातील वीज पुरवठा खंडित

वाराणसी: उत्तर प्रदेशातील वाराणसीत पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू असताना एक अजब घटना घडली. सध्या या घटनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे. वाहनांच्या तपासणीदरम्यान झालेला प्रकार पाहून वाराणसीचे एसएसपी आणि इतर पोलीस कर्मचारीदेखील हैराण झाले. वाराणसीचे एसएसपी अमित पाठक रात्रीच्या सुमारास वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी एक अजब प्रसंग घडला.पोलीस कर्मचारी वाहनांची तपासणी करत असताना तिथे संजय सिंह नावाची एक व्यक्ती दुचाकीवरून पोहोचली. त्यावेळी मध्यरात्रीचे २ वाजले होते. पोलिसांनी त्यांना थांबवलं. त्यांची चौकशी केली. आपण वीज विभागात काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी त्यांच्याकडे ओळखपत्र मागितलं. मात्र त्यांना ओळखपत्र दाखवता आलं नाही. ओळखपत्र घरी आहे. पण मी वीज विभागाचा कर्मचारी असल्याचं सिद्ध करून दाखवू शकतो, असं संजय सिंह म्हणाले. त्यावरून त्यांचा पोलिसांसोबत वाद झाला.पोलीस कर्मचाऱ्यांसोबत वाद झाल्यानं एसएसपी अमित पाठक यांनी संजय सिंह यांची चौकशी केली. पाठक यांनी त्यांना ओळखपत्र दाखवण्यास सांगितलं. त्यावरून संजय सिंह भडकले. मी आत्ता तुम्हा सगळ्यांना माझी ओळख सिद्ध करून दाखवतो, असं सिंह म्हणाले. त्यामुळे तिथे उपस्थित सगळेच हैराण झाले. यानंतर संजय सिंह यांनी करौंदी उपकेंद्राला फोन केला. त्यानंतर रात्री २ वाजून १३ मिनिटांनी संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. हा प्रकार एसएसपींसह सगळेच पोलीस कर्मचारी स्तब्ध झाले. त्यानंतर ४ मिनिटांनी म्हणजेच २ वाजून १७ मिनिटांनी परिसरातील वीज पुरवठा पूर्ववत झाला.यानंतर एसएसपी अमित पाठक यांनी पूर्वांचल विद्युत वितरणचे व्यवस्थापकीय संचालकांकडे संजय सिंह यांची तक्रार केली. व्यवस्थापकीय संचालकांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. त्यात संजय सिंह यांनी वीज पुरवठा खंडित करण्यासाठी फोन केला होता. त्यानंतर करौंदी उपकेंद्रात कार्यरत असलेल्या रामलखन यांनी वीज पुरवठा खंडित केल्याचं समोर आलं. त्यांनी याची कोणतीही नोंद लॉगबुकमध्ये ठेवली नव्हती. त्यामुळे संजय सिंह आणि रामलखन यांना निलंबित करण्यात आलं. 

टॅग्स :Policeपोलिस