शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्टोरल बाँड प्रकरण: SBI ने निवडणूक आयोगाला दिला रोख्यांचा संपूर्ण तपशील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 17:37 IST

सर्वोच्च न्यायालयाने SBI ला निवडणूक रोख्यांची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश दिले होते.

Electoral Bonds Case: इलेक्टोरल बाँड (Electoral Bonds) प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 21 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत एसबीआयला (SBI) प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले होते. त्यानुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाने गुरुवारी (21 मार्च) सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. 18 मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार, निवडणूक रोख्यांचा संपूर्ण तपशील निवडणूक आयोगाला देण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 

एसबीआयने ही माहिती दिली...एसबीआयने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, बँकेचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांनी म्हटले की, 18 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्यांनी बाँड खरेदी केलेल्या व्यक्तीचा तपशील, बाँड क्रमांक आणि रक्कम, बाँड कॅश करणाऱ्या पक्षाचे नाव, किती रुपयांचा बाँड होता, राजकीय पक्षाच्या बँक खात्याचे शेवटचे 4 क्रमांक इत्यादी माहिती निवडणूक आयोगाकडे सोपवली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोग ही सर्व माहिती आपल्या वेबसाइटवर टाकेल. 

SBI ने प्रतिज्ञापत्रात काय म्हटले?एसबीआयने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या आपल्या प्रतिज्ञापत्रात पुढे म्हटले की, राजकीय पक्षांचे संपूर्ण बँक खाते क्रमांक आणि केवायसीशी संबंधित माहिती सार्वजनिक केली जाऊ शकत नाही. यामुळे त्या खात्याच्या सुरक्षिततेवर (सायबर सुरक्षा) परिणाम होऊ शकतो. बँकेच्या अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, आता त्यांच्याकडे केवायसी तपशील आणि संपूर्ण बँक खाते क्रमांक वगळता निवडणूक रोख्यांबाबत इतर कोणतीही माहिती नाही. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSupreme Courtसर्वोच्च न्यायालयBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४