शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर, झारखंडमध्ये 5 टप्प्यांत निवडणूक

By admin | Updated: October 26, 2014 02:23 IST

जम्मू-काश्मीर आणि झारखंड या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त ठरला असून, येथे येत्या 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर यादरम्यान पाच टप्प्यांत मतदान होणार आह़े

लढाई विधानसभेची : 23 डिसेंबरला मतमोजणी 
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर आणि झारखंड या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त ठरला असून, येथे येत्या 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर यादरम्यान पाच टप्प्यांत मतदान होणार आह़े 23 डिसेंबरला मतमोजणी पार पडेल़
मुख्य निवडणूक आयुक्त व्ही़ एस़ संपत यांनी आज शनिवारी जम्मू-काश्मीर आणि झारखंड या दोन राज्यांतील निवडणूक तारखांची घोषणा केली़ दोन्ही राज्यांत 25 नोव्हेंबरला मतदानाचा पहिला टप्पा पार पडेल़यानंतर 2 डिसेंबरला दुस:या, 9 डिसेंबरला तिस:या, 14 डिसेंबरला चौथ्या आणि 2क् डिसेंबर पाचव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान पार पडेल़ 23 डिसेंबरला मतमोजणी होईल, असे त्यांनी जाहीर केल़े निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच, आजपासून दोन्ही राज्यांत निवडणूक आचारसंहिता लागू झाली आह़े जम्मू -काश्मीर विधानसभेचा कार्यकाळ 19 जानेवारीला संपत असून, 81 सदस्यीय झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 3 जानेवारीला संपतो आह़े
दरम्यान, जम्मू-काश्मिरातील महापुराच्या संकटामुळे राज्यातील निवडणुकांवर फार विशेष परिणाम संभवत नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले असतानाच राज्यातील सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सने मात्र निवडणूक तारखांबाबत तीव्र आक्षेप नोंदवला आह़े  दुसरीकडे पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी), भाजपा आणि काँग्रेसने आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत केले आह़े महापूर आणि यामुळे झालेला विध्वंस या पाश्र्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुका लांबणीवर टाकण्याची विनंती सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सने केली होती़ तथापि निवडणूक आयोगाने नियोजित कार्यक्रमानुसार निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला़ पीडीपी, माक्सर्वादी कम्युनिस्ट पार्टी(माकपा)चे नेते मोहंमद युसूफ तारगामी आणि भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नकवी यांनी आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केल़े भाजपा सुशासन, विकास आणि सुरक्षा या मुद्दय़ावर निवडणुका लढेल आणि बहुमताने जिंकेल, असा विश्वास नकवींनी व्यक्त केला़(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
दिल्लीत पोटनिवडणुका
दिल्ली विधानसभेच्या महरौली, तुघलकाबाद आणि कृष्णानगर या तीन जागांसाठीही 25 नोव्हेंबरलाच पोटनिवडणूक घेतली जाणार आह़े लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने या तीन जागांवरील आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता़ 
 
कुणाचे राजकीय पुनर्वसन करण्याआधी जम्मू-काश्मिरातील पूरग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे, असे माङो व माङया पक्षाचे मत होत़े पण निवडणूक आयोगाचे मत यापेक्षा वेगळे होत़े आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आह़े निवडणुका न लढण्याचा प्रश्नच नाही़ त्यामुळे नॅशनल कॉन्फरन्स सकारात्मकपणो या निवडणुकीस सामोरे जाईल़
- ओमर अब्दुल्ला, मुख्यमंत्री, जम्मू-काश्मीर