शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह ई. पलानीस्वामी यांच्या गटाकडे, शशिकला गटाला झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 6:44 PM

अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्व्हम गटाकडे राहील असा निर्णय निवडणूक आयोगाने गुरुवारी दिला. या निर्णयामुळे व्ही. के. शशिकला यांच्या गटाला मोठा झटका बसला आहे.

ठळक मुद्देअण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह ई. पसानीस्वामी गटाकडेव्ही. के. शशिकला यांच्या गटाला मोठा झटकाआमदार, खासदार आणि कार्यकर्ते आमच्या सोबत - ई. पसानीस्वामी

नवी दिल्ली : अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्व्हम गटाकडे राहील असा निर्णय निवडणूक आयोगाने गुरुवारी दिला. या निर्णयामुळे व्ही. के. शशिकला यांच्या गटाला मोठा झटका बसला आहे.निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर  ई. पलानीस्वामी यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच, ई. पलानीस्वामी यांनी भाजपासोबत जवळीक वाढत असल्याचा आरोप सुद्धा यावेळी फेटाळून लावला आहे. अण्णाद्रमुक पक्षाचे अनेक आमदार, खासदार आणि कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत, असा दावा त्यांनी यावेळी केला आहे. या सर्व बाबींचा विचार करुन निवडणूक आयोगाने निर्णय आमच्या बाजूने दिल्याचे ई. पलानीस्वामी यांनी सांगितले. 

अण्णाद्रमुक पक्षाचे दोन पानांचे निवडणूक चिन्ह ई. पलानीस्वामी आणि ओ. पनीरसेल्व्हम गटाकडे राहील, या निर्णयाची आम्हाला निवडणूक आयोगाकडून तोंडी सूचना मिळाली आहे. मात्र, आम्ही या निर्णयाच्या अधिकृत कागदपत्राची वाट पाहत आहोत, असे अद्रमुकचे खासदार व्ही. मैत्रेयन यांनी म्हटले.

दुसरीकडे, अद्रमुकमधील कथित लाच प्रकरणाची सुनावणी करताना गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांना टीटीव्ही दिनकरन यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल न केल्यावरुन सुनावले आहे. न्यायालयाने पोलिसांना दोन आठवड्यांत या प्रकरणाच्या स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तर आरोपी सुकेशच्या न्यायालयीन कोठडीत 5 डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला अद्रमुकच्या दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत दावा केला होता. व्ही.के. शशिकला यांच्या गटाकडून त्यांचा पुतण्या टीटीव्ही दिनकरन हे प्रकरण पाहत होता. 

 

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू