निवडणूक राजकारणाच्या परीक्षेत अपयशी ठरली - किरण बेदी
By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:32+5:302015-02-16T21:12:32+5:30
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दारुण पराभवानंतर या पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपण संपूर्ण ऊर्जा आणि अनुभवाचा वापर केल्यानंतरही निवडणूक राजकारणाच्या परीक्षेत अपयशी ठरलो, अशी खंत सोमवारी व्यक्त केली.

निवडणूक राजकारणाच्या परीक्षेत अपयशी ठरली - किरण बेदी
न ी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दारुण पराभवानंतर या पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपण संपूर्ण ऊर्जा आणि अनुभवाचा वापर केल्यानंतरही निवडणूक राजकारणाच्या परीक्षेत अपयशी ठरलो, अशी खंत सोमवारी व्यक्त केली. माजी आयपीएस अधिकारी असलेल्या बेदी यांनी एका खुल्या पत्राच्या माध्यमाने ही भावना व्यक्त केली आहे. आपल्या अधिकृत ब्लॉगवर मनोगत मांडताना त्या म्हणाल्या, परीक्षेत मी अपयशी ठरली आणि या निर्णयाची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे. परंतु माझ्यातील राजकीय क्षमता अद्यापही कायम आहे. मिळालेल्या कालावधीत माझी संपूर्ण ऊर्जा आणि अनुभव मी पणाला लावला. निश्चितच तो पुरेसा नव्हता. मी केवळ बयानबाजी करते आणि राजकीय परीक्षा उत्तीर्ण करण्याची हिंमत माझ्यात नाही, ही अपराधाची भावना मनात घेऊन मरण्याची माझी कदापि इच्छा नव्हती. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपला पराभव नसून भाजपाचा आहे, अशी प्रतिक्रिया देऊन किरण बेदी यांनी खळबळ उडवून दिली होती. (वृत्तसंस्था)