शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी, शहा, राहुल गांधींकडून आचारसंहितेचा भंग? निवडणूक आयोगाकडून आज सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 09:40 IST

निवडणूक आयोगाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधातल्या आचारसंहिता भंगांच्या आरोपांवर आज निवडणूक आयोगाकडून सुनावणी घेण्यात येणार आहे. काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांनी काल (सोमवारी) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका दाखल करुन घेत न्यायालयानं मंगळवारी सुनावणी घेण्याचे आदेश दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप करत सुष्मिता देव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी निवडणूक आयोगाला सुनावणी घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी याचिकेतून केली. द्वेषपूर्ण भाषणं केल्याचा आणि लष्कराचा राजकीय वापर केल्याचा आरोप देव यांनी याचिकेतून केला. सुष्मिता देव यांच्या वतीनं वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं सुनावणी घेतली. मोदी आणि शहा यांच्या विरोधातल्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर त्वरित सुनावणी घेण्याची मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात निवडणूक आयोगानं स्वीकारलेलं कारवाई न करण्याचं धोरण भेदभावाचं प्रतीक असून त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला धोका निर्माण होईल, अशी भीती देव यांनी व्यक्त केली. गेल्या 4 आठवड्यांत 40 तक्रारी करुनही भाजपा नेत्यांविरोधात कारवाई होत नसल्याबद्दल काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा