एक्झिट पोलचे सर्व ट्विट्स काढून टाका, निवडणूक आयोगाचे 'ट्विटर इंडिया'ला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 23:58 IST2019-05-15T23:57:28+5:302019-05-15T23:58:10+5:30
लोकसभा निवडणुकीसंदर्भात असलेले एक्झिट पोलचे सर्व ट्विट्स तत्काळ हटविण्यात यावे, असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने बुधवारी ट्विटर इंडियाला दिले आहेत.

एक्झिट पोलचे सर्व ट्विट्स काढून टाका, निवडणूक आयोगाचे 'ट्विटर इंडिया'ला आदेश
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसंदर्भात असलेले एक्झिट पोलचे सर्व ट्विट्स तत्काळ हटविण्यात यावे, असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने बुधवारी ट्विटर इंडियाला दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीचे सातव्या टप्प्यातील मतदान बाकी असतानाच ट्विटरवर एक्झिट पोल संदर्भातील ट्विट झळकू लागल्याने त्याची गंभीर दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाईचे पाऊल उचलले आहे.
Election Commission of India has ordered Twitter India to remove all the tweets related to 2019 Lok Sabha elections exit polls. pic.twitter.com/N5ed3QW9Xd
— ANI (@ANI) May 15, 2019