उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 17:17 IST2025-12-11T17:17:18+5:302025-12-11T17:17:58+5:30
Election Commission Of India: सध्या देशातील विविध राज्यांमध्ये भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाची (SIR) मोहीम सुरू आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने या एसआयआरसाठी आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्यासाठीची मुदत एक आठवड्याने वाढवली आहे.

उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
सध्या देशातील विविध राज्यांमध्ये भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाची (SIR) मोहीम सुरू आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने या एसआयआरसाठी आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्यासाठीची मुदत एक आठवड्याने वाढवली आहे. निवडणूक आयोगाला अपेक्षित संख्येमध्ये दावे आणि आक्षेप प्राप्त न झालेल्या उत्तर प्रदेशसह सहा राज्यांमध्ये आणि केंद्रसाशिय प्रदेशांमध्ये एसआयआरसाठीची ही मुदत वाढवण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू आणि गुजरातमध्ये एसआयआरसाठीची अंतिम मुदत १४ डिसेंबरवरून वाढवून १९ डिसेंबर करण्यात आली आहे. तर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि अंदमान निकोबारसाठीची अंतिम मुदत १८ डिसेंबरवरून वाढवून २३ डिसेंबर करण्यात आली आहे. तर लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये एसआयआरसाठीची मुदत २६ डिसेंबरवरून वाढवून ३१ डिसेंबर करण्यात आली आहे.
दरम्यान, एसआयआरच्या मुदतीत करण्यात आलेल्या वाढीचा फायदा घेऊन नागरिकांनी आपलं काम पूर्ण करून घ्यावं, असं आवाहन निवडणूक आयोगानं केलं आहे.