शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

दिल्ली, हरयाणा, बंगाल मधील ५९ मतदारसंघांतील प्रचार संपला; उद्या मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 6:55 AM

लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यासाठी सात राज्यांतील ५९ मतदारसंघात रविवार, १२ मे रोजी मतदान होणार असून, तेथील प्रचार शुक्रवारी संध्याकाळी संपला.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यासाठी सात राज्यांतील ५९ मतदारसंघात रविवार, १२ मे रोजी मतदान होणार असून, तेथील प्रचार शुक्रवारी संध्याकाळी संपला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, तसेच सप-बसप आघाडीचे नेते अखिलेश यादव व मायावती यांनी जाहीर सभा घेतल्या.सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १४, हरयाणातील सर्व १0, बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ८, दिल्लीतील ७ व झारखंडमधील ४ जागांसाठी मतदान होणार असून, तेथील सुमारे १0 कोटी १८ लाख मतदार आपला हक्क बजावू शकतील. या ५९ मतदारसंघांमध्ये ९७९ उमेदवार असून, तेथील मतदान केंद्रांची संख्या १ लाख १३ हजार १६७ इतकी आहे.काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंदिया, दिग्विजय सिंह, कीर्ती आझाद, शीला दीक्षित, अजय माकन, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुडा, विजेंदर सिंह, तसेच भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, मनेका गांधी, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, गौतम गंभीर, मनोज तिवारी, मीनाक्षी लेखी, गायक हंसराज हंस, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, आपच्या आतिशी, राघव छड्डा आदी उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रांमध्ये बंद होणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या या टप्प्यात हरयाणा व दिल्लीतील सर्व मतदारसंघांत मतदान पूर्ण होईल. या टप्प्यात दिल्लीत आम आदमी पक्ष, भाजप व काँग्रेस यांच्यात कमालीची चुरस असून, हरयाणामध्येही भाजप, काँग्रेस व लोक दलाचे दोन गट यांच्यात प्रामुख्याने लढती पाहायला मिळतील. बिहारमध्ये भाजप-जनता दल (संयुक्त), लोकजनशक्ती पार्टी यांची युती आणि त्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्यात लढत होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल, माकप व भाजप अशा तिरंगी लढती होणार आहेत.या ५९ मतदारसंघांमध्ये २0१४ साली ६४.२१ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता. सर्वाधिक मतदान त्यावेळी प. बंगालमध्ये (८५ टक्के) झाले होते, तर सर्वात कमी मतदान उत्तर प्रदेशात (५४.५५ टक्के) झाले होते. त्यामुळे यंदा याजागांसाठी किती मतदान होते, हेपाहायला हवे.भाजपने जिंकल्या होत्या ४४गेल्या निवडणुकीत या ५९ पैकी ४४ जागा भाजपने, तर दोन जागा त्याच्या मित्रपक्षाने जिंकल्या होत्या. काँग्रेसला दोन जागी विजय मिळाला होता, तर तृणमूलने आठ, इंडियन नॅशनल लोक दलाने दोन व समाजवादी पक्षाने एक जागा जिंकली होती. भाजपने गेल्या वेळी ज्या ४४ जागा जिंकल्या, त्यातील १९ खासदारांना भाजपने यंदा उमेदवारी दिलेली नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस