झुकेगा नहीं साला...! फूटपाथवरून शॉर्टकट घेणाऱ्या दुचाकीस्वारांना आजीनं शिकवला धडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:39 IST2026-02-13T13:33:00+5:302026-02-13T13:39:05+5:30

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून शॉर्टकट शोधणाऱ्या चालकांना केरळमधील एका वृद्ध महिलेने दिलेला धडा सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

Elderly Kerala Woman Stops Scooterist Riding on Footpath, Video Goes Viral | झुकेगा नहीं साला...! फूटपाथवरून शॉर्टकट घेणाऱ्या दुचाकीस्वारांना आजीनं शिकवला धडा

झुकेगा नहीं साला...! फूटपाथवरून शॉर्टकट घेणाऱ्या दुचाकीस्वारांना आजीनं शिकवला धडा

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून शॉर्टकट शोधणाऱ्या चालकांना केरळमधील एका वृद्ध महिलेने दिलेला धडा सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. कोझिकोड येथील एरानहिपलम परिसरात एका वृद्ध महिलेने चक्क फूटपाथवरून दुचाकी चालकांचा रस्ता अडवून त्याला माघारी फिरण्यास भाग पाडले. या धाडसी कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, नेटकरी या वृद्ध महिलेचे कौतुक करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोझिकोडच्या एरानहिपलम ट्रॅफिक सिग्नलजवळ वाहनांची मोठी रांग लागलेली असताना, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक दुचाकीस्वारांनी पादचाऱ्यांसाठी असलेल्या फूटपाथवरून गाड्या चालवण्यास सुरुवात केली. या फूटपाथवर वृद्ध आणि मुले चालत असतानाही हे चालक बेदरकारपणे गाड्या चालवत होते. हे पाहताच एका वृद्ध महिलेला राग अनावर झाला आणि त्यांनी दुचाकीस्वारसमोर उभा राहून त्यांचा रस्ता अडवला.

व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, तो दुचाकीस्वार वृद्ध महिलेला बाजूला सारून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्या आपल्या जागेवरून हलल्या नाहीत. त्यांनी ठामपणे त्याला फूटपाथ सोडून रस्त्यावर जाण्यास सांगितले. जेव्हा चालकाने वाद घालण्याचा प्रयत्न केला, तेव्हा महिलेने आपला मोबाईल काढून त्याचे रेकॉर्डिंग सुरू केले. अखेर कायद्याचा आणि लोकांच्या रोषाचा धाक वाटल्याने त्या चालकाला आपली दुचाकी मागे घेऊन मुख्य रस्त्यावर यावे लागले.


नेटकऱ्यांनी दिल्या 'अशा' प्रतिक्रिया

हा व्हिडिओ @aflu_stories_ या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत २.१ कोटींहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. कमेंट्समध्ये लोक या महिलेवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एका व्यक्तीने म्हटले आहे की, "या वयातही त्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढावे लागत आहे हे दुर्दैवी आहे, पण त्यांचे कृत्य अभिमानास्पद आहे. दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, "या महिला आमच्या हॉस्टेलच्या वॉर्डन होत्या. त्या स्वभावाने कडक असल्या तरी अत्यंत प्रेमळ आणि शिस्तप्रिय आहेत." तिसऱ्या व्यक्तीने लिहिले आहे की, "फूटपाथवरून वेगाने धावणारी वाहने पादचाऱ्यांसाठी मोठा धोका आहे. त्यांना थांबवणे ही केवळ एका महिलेची नाही, तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे."

Web Title : केरल: दादी माँ ने फुटपाथ पर बाइक चलाने वालों को सिखाया सबक

Web Summary : केरल में एक महिला ने ट्रैफिक से बचने के लिए फुटपाथ का उपयोग करने वाले बाइकर्स को रोका। कोझिकोड में फिल्माए गए उनके इस साहसिक कार्य का वीडियो वायरल हो गया, जिसमें पैदल चलने वालों के अधिकारों और सड़क नियमों को बनाए रखने के लिए उनकी प्रशंसा की जा रही है। बुजुर्ग महिला अपनी जगह पर डटी रहीं और बाइक सवार को तब तक नहीं जाने दिया जब तक कि वह मान नहीं गया।

Web Title : Kerala: Grandma Teaches Bikers a Lesson for Using Sidewalks

Web Summary : A Kerala woman blocked bikers using sidewalks to avoid traffic. Her brave act, filmed in Kozhikode, went viral, sparking praise for upholding pedestrian rights and road rules. The elderly woman stood her ground, refusing to let the biker pass until he relented.