शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

बिबटय़ाच्या हल्ल्यात वृद्ध जखमी

By admin | Updated: October 19, 2014 02:29 IST

बोंबडामळ-शिरवई येथे बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झाला.

केपे : बोंबडामळ-शिरवई येथे बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झाला. शनिवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फासात अडकलेल्या बिबटय़ाने फिलीप वाझ या वृद्धावर हल्ला केला. बिबटय़ाला वन अधिका:यांनी पकडून नंतर त्याची बोंडला प्राणिसंग्रहालयात रवानगी करण्यात आली.
बोंबडामळ-शिरवई येथे भातशेतीची नासाडी केली जाते, म्हणून वन्यप्राण्यांसाठी अज्ञातांनी फास लावून ठेवले होते. त्यात शुक्रवारी रात्री बिबटा अडकला. शनिवारी सकाळी फिलीप त्या बाजूने जाताना फासात कोणीतरी अडकल्याचे पाहण्यासाठी गेले असता बिबटय़ाने हल्ला केला. यात त्यांच्या हाताला व चेह:यावर गंभीर दुखापत झाली. त्यांना पुढील उपचारासाठी काकोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर वनाधिका:यांना माहिती देण्यात आली. केपे वन खात्याचे आरएफओ मान्युएल फर्नाडिस यांनी सहका:यांसह घटनास्थळी धाव घेतली. मडगाव वन खात्याचे एएफसी नंदकुमार परब, म्हादई अभयारण्याचे आरएफओ परेश परब, तसेच बोंडलाचे वैद्यकीय पथक  घटनास्थळी हजर झाले. बिबटय़ाला परेश परब यांनी बोंडला अभयारण्याच्या वैद्यकीय अधिकारी, मडगावचे प्राणिमित्र जुलिओ यांच्या मदतीने वनखात्यात आणले.
बिबटय़ा फासात अडकल्याचे ऐकून शेकडो लोकांनी बोंबडामळ येथे गर्दी केल्याने केपेचे पोलीस निरीक्षक प्रवीण गावस व त्यांच्या सहका:यांना लोकांना रोखण्यासाठी खूप धावपळ करावी लागली. (प्रतिनिधी)