शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
4
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
5
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
6
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
7
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
8
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
9
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
10
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
11
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
12
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
13
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
14
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
15
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
16
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
17
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
18
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
19
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
20
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 11:43 IST

न्या. सूर्यकांत आणि न्या. जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर १९ व्या क्रमांकावर शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. मागील ३ वर्षापासून हा खटला प्रलंबित आहे.

नवी दिल्ली - गेल्या ३ वर्षापासून रखडलेल्या शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत आजपासून सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दोन्ही पक्षाचे वकील अंतिम युक्तिवाद करतील. त्यानंतर कोर्टाकडून या खटल्यावर निकाल येणे अपेक्षित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करत ४० आमदारांसह उद्धव ठाकरेंच्या सरकारमधून बाहेर पडले. त्यानंतर शिंदेंच्या नेतृत्वात बंडखोर आमदारांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला. निवडणूक आयोगानेही शिंदेंच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह घ्यावे लागले. परंतु हा संपूर्ण वाद सुप्रीम कोर्टात गेला. त्यावर वेळोवेळी सुनावणी पार पडली. मात्र आता या खटल्याच्या अंतिम सुनावणीला आजपासून सुरुवात होणार आहे. त्यात आमदारांच्या अपात्रतेबाबतही कोर्ट निकाल देणार आहे. शिवसेनेसोबत राष्ट्रवादीच्या याचिकेवरही आज सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीसाठी सुप्रिया सुळे, अनिल परब, अनिल देसाई उपस्थित राहणार आहेत.

न्या. सूर्यकांत आणि न्या. जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर १९ व्या क्रमांकावर शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. मागील ३ वर्षापासून हा खटला प्रलंबित आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल देत शिवसेना पक्ष आणि चिन्ह त्यांना बहाल केले होते. त्याला उद्धव ठाकरे यांच्याकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय पूर्णपणे असंवैधानिक आणि पक्षपाती असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. उद्धव ठाकरेंच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल कोर्टात बाजू मांडत आहेत. याआधीच्या सुनावणीत आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिला होता. विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेत दोन्ही पक्षांची बाजू ऐकून निकाल दिला. यावेळी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवण्यात आले होते. 

आतापर्यंत काय काय घडलं?

८ ऑक्टोबर २०२२ रोजी निवडणूक आयोगाने शिंदे-ठाकरे या दोन्ही गटाला धनुष्यबाण वापरण्यास बंदी घातली. 

१७ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोगाने धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल हे नवे चिन्ह दिले. 

२२ फेब्रुवारी २०२३ रोजी सुप्रीम कोर्टाने आयोगाच्या निर्णयावर स्थगिती नाकारली. 

२०२४ ते २०२५ या काळात कलम ३७० वरील प्रकरणामुळे वारंवार सुनावणीला विलंब झाला. अनेक वेळा या खटल्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर १४ जुलै २०२५ रोजी उद्धव ठाकरे यांच्या वतीने सुप्रीम कोर्टात अर्ज करून तातडीची सुनावणी करण्याची मागणी केली, पण कोर्टाने ऑगस्ट महिन्यात सुनावणी घेऊ असं सांगितले.  ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा ठाकरेंच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने सुनावणीची मागणी केली, मात्र तेव्हाही ही सुनावणी होऊ शकली नाही. आता १२ नोव्हेंबर २०२५ रोजी सुप्रीम कोर्टात या खटल्यावर अंतिम सुनावणी होणार आहे. ही सुनावणी निर्णायक टप्प्यावर असल्याने सुप्रीम कोर्ट शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत काय निर्णय देते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Supreme Court to rule on Shiv Sena name, symbol today.

Web Summary : The Supreme Court will deliver its final verdict on the Shiv Sena name and symbol dispute, involving Uddhav Thackeray and Eknath Shinde factions. Disqualification of MLAs is also on the agenda, closely watched by Maharashtra amidst local elections.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय