भाजपच्या मुख्यमंत्र्यांसह एकूण 28 मंत्री; सत्ता स्थापनेबाबत शहा आणि फडणवीसांमध्ये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 09:24 PM2022-06-28T21:24:47+5:302022-06-28T21:31:19+5:30

Maharashtra Political Crisis: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये राज्यात सरकार स्थापनेबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

Eknath Shinde revolt | Maharashtra Political Crisis | Discussion between Amit Shah and Devendra Fadnavis about government formation in Maharashtra | भाजपच्या मुख्यमंत्र्यांसह एकूण 28 मंत्री; सत्ता स्थापनेबाबत शहा आणि फडणवीसांमध्ये चर्चा

भाजपच्या मुख्यमंत्र्यांसह एकूण 28 मंत्री; सत्ता स्थापनेबाबत शहा आणि फडणवीसांमध्ये चर्चा

Next

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये राज्यात सरकार स्थापनेबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर येत आहे.

महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपच्या कोट्यातील मंत्र्यांबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत वकील आणि राज्यसभा खासदार महेश जेठमलानी यांचा सहभाग होता. त्यांच्या उपस्थितीत दोघांमध्ये सर्व कायदेशीर मुद्द्यांवरही बरीच चर्चा झाली. सरकार स्थापनेच्या मार्गात येणाऱ्या सर्व समस्यांबाबत कायदेशीर मार्गाची सविस्तर माहिती गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर ठेवण्यात आली.

...तर भाजपचाच मुख्यमंत्री असेल
सरकार स्थापन झाल्यास मुख्यमंत्री भाजपचा असेल आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांसह एकूण 28 मंत्री असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. गृहमंत्र्यांसमोर मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्याबाबतही सविस्तर चर्चा झाली. यादरम्यान केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी खराब इमेज असलेल्या लोकांना सरकारमधून बाहेर ठेवण्यास सांगितले आहे. शहा यांना भेटण्यापूर्वी फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही भेट घेतली. 

महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती काय?
शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील सरकार कोसळण्याची शक्यता आहे. शिंदे आपल्यासोबत सूमारे 50 आमदार घेऊन गेल्याने सरकार अल्पमतात आहे. हे प्रकर सध्या सर्वोच्च न्यायालयात गेले असून, सुप्रीम कोर्टाने सोमवारी शिंदे गटाला दिलासा दिला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींनी बजावलेल्या नोटीसमध्ये शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना हजर राहण्यासाठी न्यायालयाने 12 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मुदतवाढ दिली.

Web Title: Eknath Shinde revolt | Maharashtra Political Crisis | Discussion between Amit Shah and Devendra Fadnavis about government formation in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.