दिल्लीत मालवाहतूक गाडीचे ८ डब्बे रुळावरुन घसरले; रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 13:49 IST2024-02-17T13:46:48+5:302024-02-17T13:49:57+5:30

सध्या मालगाडीचे रुळावरून घसरलेले डबे सरळ करण्याचे काम सुरु आहे.

Eight wagons of a goods train derail on Patel Nagar-Dayabasti section in Delhi area. | दिल्लीत मालवाहतूक गाडीचे ८ डब्बे रुळावरुन घसरले; रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल

दिल्लीत मालवाहतूक गाडीचे ८ डब्बे रुळावरुन घसरले; रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल

नवी दिल्ली: दिल्लीतील झाखिरा फ्लायओव्हरजवळ आज सकाळी 11.52 च्या सुमारास रेल्वे अपघात झाला. मालगाडीचे 8 डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली.

सदर अपघाताबाबत माहिती मिळताच रेल्वे आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. मालगाडीत लोखंडी पत्र्यांचे रोल्स भरलेले होते. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. सध्या मालगाडीचे रुळावरून घसरलेले डबे सरळ करण्याचे काम सुरु आहे. तसेच ट्रॅक दुरुस्तीचे कामही सुरू आहे.

 

Web Title: Eight wagons of a goods train derail on Patel Nagar-Dayabasti section in Delhi area.