शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

काश्मीरमध्ये आठ महिन्यांत १३९ दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2019 5:18 AM

घुसखोरीचे अनेक प्रयत्न हाणून पाडले

श्रीनगर : यंदाच्या वर्षी १ जानेवारीपासून ते २९ आॅगस्टपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने १३९ दहशतवाद्यांचा खात्मा केला अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या संघर्षात तसेच काश्मीरमध्ये विविध ठिकाणी झालेल्या चकमकीत हे दहशतवादी ठार झाले आहेत.

गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत २६ जवान शहीद झाले. त्यातील सर्वाधिक मृत्यू फेब्रुवारीत झाले. त्या महिन्यात आठ जवान शहीद झाले होते. एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, आॅगस्ट महिन्यात झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले तर एकाला जिवंत पकडण्यात आले. मे महिन्यामध्ये लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत २७ दहशतवादी ठार झाले. यंदाच्या अन्य महिन्यांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा झालेला नाही. मे महिन्यात २२ दहशतवादी कारवाया घडल्या. यंदाच्या अन्य महिन्यांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे.शस्त्रसंधीचे उल्लंघन५ आॅगस्टनंतर ते २९ आॅगस्टपर्यंत सीमेवर पाकिस्तानने २२२ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. त्याआधी जुलै महिन्यांत पाकिस्तानने २९६ वेळा असे प्रकार केले होते. गेल्या आठ महिन्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर १८९९ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानकडून असे प्रकार गेल्या वर्षी याच कालावधीत १८८९ वेळा घडले होते.जम्मू- काश्मिरातील काही नेत्यांना अटक करण्यात आलेली असून, या नेत्यांना ‘शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर’येथे ठेवण्यात आलेले आहे. पाकशी वाटाघाटी नाही : एस. जयशंकरलंडन : पाकिस्तान उघडपणे दहशतवादाला खतपाणी घालत आहे. जोपर्यंत इस्लामाबादमधून अतिरेकी गटांना आर्थिक रसद पुरविली जाते, या गटांमध्ये माथेफिरुंचा भरणा केला जात आहे, तो पर्यंत पाकिस्तानशी वाटाघाटी करण्याची कोणतीही शक्यता नाही, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांनी स्पष्ट केले.पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरबद्दल ‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये लिहिलेल्या लेखाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना जयशंकर बोलत होते. अण्वस्त्राची छाया दक्षिण आशियावर दाटलेली असताना तातडीने चर्चा केली पाहिजे, अशी अपेक्षा खान यांनी व्यक्त केली होती.जयशंकर यांनी ‘पॉलिटिको’ या प्रसार माध्यमाला ब्रुसेल्समध्ये मुलाखत दिली. ते म्हणाले की, पाकिस्तान उघडपणे दहशतवाद पसरवित असताना चर्चेची कल्पना करणे योग्य नाही. काश्मीरमध्ये परिस्थिती कशी आहे, असे विचारले असता येत्या दिवसांमध्ये खोºयातील सुरक्षा दलांचे नियंत्रण कमी केले जाईल, असे नमूद केले. ते म्हणाले की, अतिरेकी शक्तींची सक्रीयता थांबविण्यासाठी, हिंसा घडविण्यासाठी एकमेकांच्या संपर्कात असलेल्या लोकांमधील संवाद थांबविण्यासाठी इंटरनेट, टेलिफोन सेवा यांच्यात कपात करणे आवश्यक होते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादी