शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बादली अपवित्र केली म्हणून आठ महिन्यांच्या गर्भवती दलित महिलेला अमानुष मारहाण, पोटातल्या बाळासह महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 12:29 IST

घरातील बादलीला चुकून स्पर्श केला म्हणून एका  गर्भवती दलित महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ठळक मुद्दे15 ऑक्टोंबरला सकाळी नऊ वाजता नेहमीप्रमाणे सावित्री देवी गावातील कचरा गोळा करण्याठी गेली. रिक्षामुळे सावित्रीला तोल सावरता आला नाही व तिने तिथे ठेवलेल्या बादलीला स्पर्श केला.

लखनऊ - ठाकूरांच्या घरातील बादलीला चुकून स्पर्श केला म्हणून एका गर्भवती दलित महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यातील खेतालपूर भानसोली गावात 15 ऑक्टोंबरला ही  घटना घडली. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सावित्री देवी असे मृत महिलेचे नाव असून ती आठ महिन्यांची गर्भवती होती. 

15 ऑक्टोंबरला सकाळी नऊ वाजता नेहमीप्रमाणे सावित्री देवी गावातील कचरा गोळा करण्याठी गेली. एका ठाकूरच्या घरातून कचरा उचलत असताना अचानक एक रिक्षा तिथे येऊन थांबली. या रिक्षामुळे सावित्रीला तोल सावरता आला नाही व तिने तिथे ठेवलेल्या बादलीला स्पर्श केला. सावित्रीने बादलीला स्पर्श केल्याचे पाहताच त्या घरातील महिला अंजूला संताप अनावर झाला. अंजून सावित्रीच्या पोटात बुक्के मारले आणि तिचे डोके धरुन भिंतीवर आपटले. 

तू स्पर्श करुन आमची बादली अपवित्र केलीस असे अंजू मारहाण करताना बोलत होती. त्यानंतर अंजूचा मुलगा रोहित तिथे आला व त्याने सुद्धा काठिने सावित्री देवीला मारले असे कुसूम देवीने सांगितले. कुसूम सावित्रीची शेजारी आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सावित्रीचा आणि तिच्या पोटातील बाळाचा सहादिवसांनी मृत्यू झाला. डोक्याला मार लागल्यामुळे सावित्रीचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. 

सावित्रीला मारहाण झाली त्यादिवशी तिची नऊ वर्षांची मुलगी तिच्यासोबत होती. आईला मारहाण सुरु झाल्यानंतर तिने लगेच मदतीसाठी तिच्या वस्तीकडे धाव घेतली. ज्यावेळी मी आणि अन्य महिला तिथे पोहोचलो त्यावेळी अंजू आणि तिचा मुलगा सावित्रीला मारहाण करत होता. आम्ही मध्येपडून सावित्रीची सुटका केली असे कुसूम देवीने सांगितले. सावित्रीला गावातील पाच घरांचा कचरा उचलण्याचे महिन्याला 100 रुपये मिळायचे. 

मारहाण झाली त्याचदिवशी मी सावित्रीला घेऊन जिल्हा रुग्णालयात गेलो. पण बाहेरुन कुठलीही जखम नसल्यामुळे ती पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सांगून डॉक्टरांनी तिला परत घरी पाठवून दिले. घरी आल्यानंतर सावित्री सतत डोक आणि पोटात दुखत असल्याची तक्रार करत होती असे सावित्रीचे पती दिलीप कुमार यांनी सांगितले.  

टॅग्स :Crimeगुन्हा