भीषण अपघात! मंदिरातून परतताना काळाचा घाला; कार-ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 17:53 IST2023-10-15T17:52:15+5:302023-10-15T17:53:04+5:30
तिरुवन्नमलाई-बंगलोर महामार्गावर हा अपघात झाला. कारमधील लोक तामिळनाडूतील एका मंदिरात दर्शन घेऊन कर्नाटकची राजधानी बंगळुरूला परतत होते.

फोटो - आजतक
तामिळनाडूमध्ये एका भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. ही घटना चेंगम शहरात घडली असून कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन 8 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे.
रविवारी कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत दोन मुलांसह आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. चेंगम शहर पोलिसांनी सांगितले की अपघाताचे कारण तपासले जात आहे, परंतु चार पुरुष आणि एक महिला तसेच दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला.
तिरुवन्नमलाई-बंगलोर महामार्गावर हा अपघात झाला. कारमधील लोक तामिळनाडूतील एका मंदिरात दर्शन घेऊन कर्नाटकची राजधानी बंगळुरूला परतत होते. पोलिसांनी सांगितले की, आणखी एका महिलेला सरकारी रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाला आणि मृतांची संख्या 8 वर पोहोचली.
तामिळनाडू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकने थेट धडक दिल्याने कारचं नुकसान झालं. कारमध्ये बसलेल्या लोकांचे मृतदेह गॅस कटरने कापून काढण्यात आले. ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला असून चालकाचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.