शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Education Budget 2022 : डिजिटल शिक्षणाला बुस्टर डोस! शालेय विद्यार्थांसाठी 100 चॅनेल्स सुरू करणार; शिक्षण तुमच्या दारी येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 12:02 IST

Education Sector Budget 2022 : कोरोनामुळे देशातील छोट्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं आहे. वन क्लास वन टीव्ही चॅनलद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत.

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज (1 फेब्रुवारी 2022) रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना काय काय मिळणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. याच दरम्यान विज्ञानाची प्रगती आणि टेक्नॉलॉजी आपल्याला कशा पध्दतीने एकत्र आणू शकते याचा प्रत्यय कोरोना महासाथीमध्ये पाहायला मिळाला. शालेय शिक्षण असो की उच्च शिक्षण, सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनमुळे पारंपरिक शिक्षण पद्धतीऐवजी डिजिटल पद्धतीने अभ्यास आणि परीक्षा घेतल्या जात आहेत. त्याचबरोबर शालेय आणि उच्च शिक्षणात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याची प्रक्रियाही देशात सुरू आहे. अशातच अर्थमंत्र्यांनी शालेय शिक्षणासाठी 100 चॅनेल्स सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. 

कोरोनामुळे देशातील छोट्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं आहे. 'वन क्लास वन टीव्ही चॅनल'द्वारे प्रयत्न केले जाणार आहेत. शालेय शिक्षणासाठी 100 चॅनेल्स सुरू करणार. विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेत शिकवणार. रेडिओ, टीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. वन क्लास वन टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पहिली ते बारावीसाठी चॅनेल सुरू करणार. प्रादेशिक भाषांमध्ये हे चॅनेल काम करतील. यासाठी इंटरनेट रेडिओ आणि डिजिटल साधनांचा वापर करण्यात येईल असं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

डिजिटल विद्यापीठ सुरू करणार असून हे विद्यापीठ देशातील प्रादेशिक भाषांमध्ये सुरू होणार आहे. ई कंटेन्ट तयार करण्यासाठी देशातील मोठी विद्यापीठ आणि सरकार एकत्र काम करणार असल्याचं असं देखील निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. कोरोनाकाळात मानसिक समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे देशात 21 मानसिक समस्या समुपदेशन केंद्र सुरू करणार आहे. तसेच देशातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामधून देशात 60 लाख नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

 

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022Educationशिक्षणIndiaभारतNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनnirmala sitharamanनिर्मला सीतारामन