शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय -

By admin | Updated: June 17, 2014 17:50 IST

गोव्यात पावसाळा हा कवींसाठी स्फूर्तीदायी ठरत असेल. परंतु सामान्य नागरिकांसाठी मात्र तो अडचणीचा, संकटांचा आणि कधी जीवघेणाही वाटत आला आहे. सोमवारी सलामीलाच पावसाने गोव्याला या आपल्या स्वभावाची प्रचिती आणून दिली. पावसाला जोर नाही आणि मान्सून तर संपूर्ण ताकदीने या भूमीत अजून अवतरायला अवकाश आहे असे वाटत असतानाच पणजी आणि विशेषत: उत्तर गोव्यात तो धुवांधार बरसला व त्याने जनजीवन विस्कळीत करून टाकले. जराशा पावसाने झाडे पडणे, पाणी तुंबणे, घरात पाणी शिरणे हे प्रकार राज्याच्या ग्रामीण भागात सतत अनुभवायला येत असतात. स्थानिक पंचायतींना मान्सूनपूर्व कामे वेळेवर आटोपण्यात अपयश आल्याचा तो परिणाम असतो. सध्या खाणी तरी बंद आहेत. नाहीतर पावसाळ्यात खाणींच्या परिघात राहणार्‍या लोकांना जीव मुठीत धरून राहावे लागते. असे एकही वर्ष जात नाही, जेव्हा खाणी कोसळून किंवा

गोव्यात पावसाळा हा कवींसाठी स्फूर्तीदायी ठरत असेल. परंतु सामान्य नागरिकांसाठी मात्र तो अडचणीचा, संकटांचा आणि कधी जीवघेणाही वाटत आला आहे. सोमवारी सलामीलाच पावसाने गोव्याला या आपल्या स्वभावाची प्रचिती आणून दिली. पावसाला जोर नाही आणि मान्सून तर संपूर्ण ताकदीने या भूमीत अजून अवतरायला अवकाश आहे असे वाटत असतानाच पणजी आणि विशेषत: उत्तर गोव्यात तो धुवांधार बरसला व त्याने जनजीवन विस्कळीत करून टाकले. जराशा पावसाने झाडे पडणे, पाणी तुंबणे, घरात पाणी शिरणे हे प्रकार राज्याच्या ग्रामीण भागात सतत अनुभवायला येत असतात. स्थानिक पंचायतींना मान्सूनपूर्व कामे वेळेवर आटोपण्यात अपयश आल्याचा तो परिणाम असतो. सध्या खाणी तरी बंद आहेत. नाहीतर पावसाळ्यात खाणींच्या परिघात राहणार्‍या लोकांना जीव मुठीत धरून राहावे लागते. असे एकही वर्ष जात नाही, जेव्हा खाणी कोसळून किंवा डंपवरची माती वाहत येऊन ती लोकांच्या घरात शिरली नाही. घरे कोसळणे, लोकांचे संसार उघड्यावर पडणे आणि जीवितहानीही होण्याचे प्रकार तर ग्रामीण भागांसाठी पाचवीलाच पुजले होते. गेली दोन वर्षे अशा लोकांना काही प्रमाणात आश्वस्त जीवन अनुभवास मिळाले आहे. असे असले तरी खाणी लवकर सुरू करा म्हणून परवा डिचोली तालुक्यातील लोक रस्त्यावर आल्याचे एक विपर्यस्त दृश्य पाहायला मिळाले. खाण अवलंबितांची संख्या सरकार पातळीवर वेगळी सांगितली जाते, परंतु अशा मोर्चात मात्र त्यांची बरी उपस्थिती पाहायला मिळते. पंतप्रधान मोदी यांच्या गोवा भेटीच्या पूर्वसंध्येला तर वेगवेगळ्या भागांमधून खाण अवलंबितांना अचानक कंठ फुटल्यासारखा झाला. यापूर्वी त्यांच्या संघटनांनी आपापल्या खाणींपासून जीवनाची सुरक्षा मिळावी म्हणून आवाज उठविला आहे, असे घडलेले नाही. आता तर खाणी बंद झाल्याचे निमित्त करून खाण चालकांनी जी थोडीबहुत सामाजिक कार्ये चालविली होती, तीही बंद केली आहेत. वर्षाकाठी ज्या कंपन्यांनी १५ हजार कोटी रुपये नफा कमावला आणि ज्यांनी लोकांना साध्या सुरक्षा व्यवस्थाही निर्माण केल्या नाहीत, त्यांची मानसिकता अशा कठीण वेळीच जनतेसमोर येत असते. त्यामुळे आता खाण अवलंबितांनी खाणी सुरू करा, परंतु त्या जुन्या कंपन्यांना लिजेस मिळू नयेत यासाठी आपला आवाज बुलंद बनविला पाहिजे. जी गोष्ट खाणींनी ग्रामीण भागांची केली, ती बिल्डर्सनी शहरांची केली आहे. सोमवारी अवघा दोन तास पाऊस पडला तर पणजी पाण्याखाली गेली. संपूर्ण बाजारात पाणी तुंबले व गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले. बिल्डर्सनी पाणी वाहत जाण्याचे मार्ग अडविले व गटारांवर इमारती उभ्या केल्याचा हा परिणाम आहे. पालिका व लोकनियुक्त सरकारला नियम अत्यंत कठोरपणे राबविण्यात अपयश आले. पणजी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. या शहराला राजधानीचा दर्जा आहे. परंतु शहरातील नागरिकांचे जीवन अत्यंत असुरक्षित आहे. त्याची प्रचिती सलामीच्या पावसात आली. गटाराचे पाणी रस्त्यावर आले आहे, याचा अर्थ रोगराईस आमंत्रण. शिवाय शहरात अनेक ठिकाणी वाहनांची कोंडी झाली. पणजीच्या महापौरांचा दावा आहे की, मिरामारचा रस्ता मलनिस्सारणासाठी खोदून ठेवला आहे. त्याचप्रमाणे गटारे साफ करण्यासाठी महानगर पालिकेने तीन वेळा निविदा जाहीर केल्या, परंतु राज्य प्रशासनाने त्यात कोलदांडा घातला! पणजीचे महापौर सतत राज्य सरकारवर आरोप करतात. राज्य सरकारने पणजीची अनेक कामे अडवून धरली आहेत, त्याचप्रमाणे बर्‍याच कामांसाठी निधीही पुरविला जात नाही, अशी त्यांची तक्रार आहे. पणजी महानगर पालिका ताब्यात घेण्याचा सत्ताधारी पक्षाने अनेक वेळा प्रयत्न केला. यात तथ्य आहे. सत्ताधारी भाजपा महानगर पालिकेला अडचणीत आणण्याची राजकीय खेळी करीत असल्याचे बर्‍याचवेळा दिसून आले आहे. परंतु दोन्ही गटांमधील या हमरीतुमरीने शहराची कोंडी होऊ लागली आहे आणि नागरिकांचे जीवन असुरक्षित बनले असेल तर ती खरोखरीच चिंतेची बाब आहे. परंतु सर्वच दोष राज्य सरकारवर ढकलून पालिकेला नामानिराळे राहाता येणार नाही. जवाहरलाल नेहरू पुनर्निर्माण योजनेअंतर्गत पणजी पालिकेला निधी मिळविता आलेला नाही. याचे कारण कार्यक्षमतेचा अभाव हे आहे. सांतीनेज खाडीपसून कचर्‍याची विल्हेवाट आणि बेकायदेशीर इमारतींपासून बाजारातील दुरवस्था हे प्रश्न पालिकेला व्यवस्थित हाताळता आलेले नाहीत. बिल्डर्सना वेसण घालण्याचा प्रश्न आणि स्वच्छता हे प्रश्न पालिकेला हाताळण्यास कोण अडथळे आणते? पावसाळ्यापूर्वीची कामे करून घेण्यास अपयश आल्याचे प्रकरण तर अनास्था, निष्काळजीपणा आणि निष्क्रियता या सदरातच मोडते. सलामीच्या पावसातच पणजी शहर पाण्याखाली जाऊन नागरिकांना अडचणी सोसाव्या लागल्याने तर आता पुढच्या दोन महिन्यात नागरिकांपुढे काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज करता येतो. सरकार अिाण पालिका दोघांच्याही अनास्थेचा हा परिणाम असून परिस्थिती खालावत जाऊन या शहरात गंभीर रोगाची साथ पसरू शकते याचा इशारा द्यावासा वाटतो. लक्षात घेतले पाहिजे की पावसाळा सुरू होण्याआधीच गोव्यात डेंग्यू व मलेरियाने तिघांचे बळी घेतले असून हा रोग सहज पसरविण्याइतपत परिस्थिती राज्यातील सार्‍या शहरांची बनली आहे. आधीच कचर्‍याची गंभीर बनलेली परिस्थिती आणि गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहू लागण्याचे प्रकार राज्यात गंभीर साथ पसरण्याइतकी गंभीर आणि स्फोटक आहे! वरवर या सर्वाला निमित्त पावसाचे वाटत असली तरी त्यामागची करणी मानवनिर्मितच आहे.