शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस यांच्याविरोधात ईडीची मोठी कारवाई, PMLA अंतर्गत 45.92 लाखांची मालमत्ता जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 19:18 IST

Salman Khurshid's wife Louise : ईडीने पीएमएलए अंतर्गत काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांची पत्नी लुईस खुर्शीद आणि इतर आरोपींची 45.92 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस खुर्शीद यांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. ईडीने पीएमएलए अंतर्गत काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांची पत्नी लुईस खुर्शीद आणि इतर आरोपींची 45.92 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या टीमने उत्तर प्रदेशातील फरुखाबादमधील 29.51 लाख रुपयांची मालमत्ता आणि 4 बँक खात्यांमधील 16.41 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण डॉ झाकीर हुसेन मेमोरियल ट्रस्टमधील घोटाळ्याशी संबंधित आहे. 

ट्रस्टचे पैसे वैयक्तिकरित्या वापरल्याचा आरोप आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी लुईस खुर्शीद आणि इतर आरोपींविरुद्ध 17 प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाचा ताबा ईडीने घेतल्यानंतर पीएमएलए अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.

काय आहे प्रकरण?2009-2010 या वर्षात डॉ. झाकीर हुसेन मेमोरियल ट्रस्टद्वारे जवळपास 17 शिबिरे आयोजित करून अपंगांना कृत्रिम अवयवांचे उपकरण वाटपाच्या प्रकरणात फसवणूक केल्याचा आरोप होता. दरम्यान, 2017 मध्ये हे प्रकरण औपचारिकपणे लोकांसमोर आले, जेव्हा या प्रकरणी अनेक गुन्हे दाखल झाले. त्यावेळी अनेक दिव्यांगांना कृत्रिम अवयवदानाची उपकरणे वितरीत करण्यात आली नसून, त्यासाठीचे बिल अदा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे याप्रकरणी फर्रुखाबादच्या भोजीपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणात दिव्यांगांना कृत्रिम अवयवदानाची उपकरणे वाटप करताना विकास गट भोजीपुरा येथे बनावट शिक्का, बनावट स्वाक्षरी आणि सरकारी पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास केल्यानंतर स्थानिक पोलिसांनी आरोपपत्रही दाखल केले आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर राहण्यासाठी अनेकवेळा वॉरंट बजावण्यात आले आणि त्यावेळी अटक होण्याची शक्यता होती, मात्र नंतर दोन्ही आरोपींना न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता.

टॅग्स :salman khurshidसलमान खुर्शिदUttar Pradeshउत्तर प्रदेशEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय