शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

कार्ती चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ, दिल्ली आणि चेन्नईतील ठिकाणांवर ईडीचे छापे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 12:01 PM

माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती यांच्याशी संबंधित असणा-या संपत्तीवर अंमलबाजवणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले आहेत

नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित असणा-या संपत्तीवर अंमलबाजवणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले आहेत. कार्ती चिदंबरम यांच्या दिल्ली आणि चेन्नईमधील ठिकाणावंर आज सकाळी हे छापे टाकण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे. हे छापे एअरसेल-मॅक्सीस प्रकरणातील मनी लाँड्रिंगच्या संबंधातील आहेत. 1 डिसेंबर रोजीसुद्धा अशाच प्रकारचा तपास करण्यात आला होता. 

मनी लाँड्रिंग प्रकरणी गैरहजर राहिल्याने गुरुवारी ईडीने कार्ती चिदंबरमविरोधात समन्स जारी केला होता. आता त्यांना 16 जानेवारीला हजर राहण्याचा आदेश देण्यता आला आहे. याआधी त्यांना गुरुवारी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं, मात्र ते गैरहजर राहिले. 

 

काय आहे प्रकरणसीबीआयकडून विशेष कोर्टात दाखल असलेल्या चार्जशीटनुसार, मॅक्सिसची सहाय्यक कंपनी ग्लोबल कम्युनिकेशन सर्व्हिसेज होल्डिंग्ज लिमिटेडने एअरसेलमध्ये 800 मिलियन डॉलरच्या गुंतवणुकीसाठी मंजुरीची मागणी केली होती. आर्थिक प्रकरणात कॅबिनेट कमिटी या प्रकरणात परवानगी देण्यास सक्षम आहे. तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी त्यासाठी अनुमोदनही दिलं होतं. या प्रकरणात कार्ती चिदंबरम यांच्यावरही भ्रष्टाचाराचा आरोप आहे. तसेच पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला 2007मध्ये नियमापेक्षा अधिक विदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप आहे. कंपनीला फक्त 4.62 कोटींची विदेश गुंतवणूक करण्याची परवानगी असताना त्यांनी 305 कोटी रुपये उभे केले होते. कार्ती चिदंबरम यांनी आपल्या वडिलांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही लावण्यात आला होता. 

सीबीआयने 4 ऑगस्ट रोजी कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती. नोटीसमधून देश सोडून बाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली होती. यानंतर कार्ती चिंदबरम यांनी सीबीआयच्या नोटीसला विरोध करत मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही नोटीस रद्द करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. मद्रास उच्च न्यायालयाने 10 ऑगस्ट रोजी गरज नसल्याचं सांगत लूकआऊट नोटीसला स्थगिती दिली होती.

एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं कार्ती चिदंबरम यांची 1.16 कोटींची संपत्ती जप्त केली असून, बँक अकाऊंट आणि एफडीही गोठवली आहेत. विशेष म्हणजे 90 लाख रुपयांची एफडी कार्ती चिदंबरम यांची बँकेत जमा आहे.  

टॅग्स :Karti Chidambaramकार्ती चिदंबरमEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय