शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

मनी लाँड्रिंग प्रकरणी फारुख अब्दुल्ला यांच्या अडचणीत वाढ, आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 18:38 IST

Farooq Abdullah : फारुख अब्दुल्ला यांच्यासह अहसान अहमद मिर्झा, मीर मंजूर गझनफर आणि इतरांची नावेही आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आली असून, पीएमएलए कोर्टाने सर्व आरोपींना पीएमएलएच्या विशेष कोर्टात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे.

श्रीनगर : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मंगळवारी नॅशनल कॉन्फरन्सचे (NC) अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्याविरोधात जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन (JKCA) मधील कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी पीएमएलए कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.

फारुख अब्दुल्ला यांच्यासह अहसान अहमद मिर्झा, मीर मंजूर गझनफर आणि इतरांची नावेही आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आली असून, पीएमएलए कोर्टाने सर्व आरोपींना पीएमएलएच्या विशेष कोर्टात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. सर्व आरोपींना 27 ऑगस्टला हजर राहण्यास सांगितले आहे.

फारुख अब्दुल्ला हे 2001 ते 2012 पर्यंत जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. 2004 ते 2009 मधील कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत सीबीआय आणि ईडीद्वारे चौकशी सुरू आहे. ईडीने यापूर्वीच 21 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये फारुख अब्दुल्ला यांच्या 11.86 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.

या प्रकरणी फारुख अब्दुल्ला यांची ईडीने अनेकदा चौकशी केली आहे. 31 मे रोजी श्रीनगरमध्ये तीन तासांहून अधिक काळ फारुख अब्दुल्ला यांची अखेरची चौकशी करण्यात आली होती. श्रीनगरमधील राममुन्शी बाग पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन पदाधिकाऱ्यांविरोधात मनी लाँड्रिंगची चौकशी सुरू केली.

दरम्यान, आतापर्यंतच्या तपासात अहसान अहमद मिर्झाने जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन इतर पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने 51.90 कोटी रुपये निधीचा  गैरवापर केला आणि त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक दायित्वांची पुर्तता करण्यासाठी गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेचा वापर केला, असा दावा ईडीने केला आहे.  

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयJammu Kashmirजम्मू-काश्मीर