शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक आरक्षण वैध, केंद्र सरकारने केलेली १०३वी घटनादुरुस्ती मंजूर; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 06:08 IST

​​​​​​​देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने २०१९ मध्ये १०३ वी घटना दुरुस्ती केली होती.

नवी दिल्ली :

मागासवर्गीय वगळून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शैक्षणिक व केंद्र सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने केलेली १०३ वी घटना दुरुस्ती वैध असल्याचा ऐतिहासिक निर्णय सोमवारी सरन्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखाली गठित घटनापीठाने बहुमताने दिला. देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने २०१९ मध्ये १०३ वी घटना दुरुस्ती केली होती. याला यूथ फॉर इक्वालिटी या स्वयंसेवी संस्थेसह ४० याचिकांद्वारे आव्हान दिले. यावर सरन्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर सुनावणी सुरू होती. घटनापीठात न्या. दिनेश माहेश्वरी, न्या. बेला त्रिवेदी, न्या. जे. बी. पारडीवाला व न्या. एस. रवींद्र भट्ट यांचा समावेश होता. हा ऐतिहासिक निर्णय देताना घटनापीठाचे एकमत होऊ शकले नाही. 

घटनादुरुस्तीला वैध ठरविण्याला सरन्यायाधीश उदय लळित व एस. रवींद्र भट यांनी विरोध केला. न्या. दिनेश माहेश्वरी,  न्या. बेला त्रिवेदी व न्या. जे. बी. पारडीवाला यांनी या घटना दुरुस्तीचे समर्थन करताना १०३व्या घटना दुरुस्तीमुळे राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेला धक्का पोहोचलेला नसल्याचे स्पष्ट केले.असे स्वरूप आहे ईडब्ल्यूएस कोट्याचे- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) याआधी शासकीय नोकऱ्या, शिक्षणसंस्थांमध्ये आरक्षण नव्हते. - मात्र, राज्यघटनेतील १५ व १६व्या कलमांमध्ये दुरुस्त्या करून ईडब्ल्यूएस वर्गातील लोकांना नोकऱ्या, शिक्षणसंस्थांमध्ये १० टक्के आरक्षण देण्यात आले. - १०३व्या घटनादुरुस्तीद्वारे ही तरतूद करण्यात आली. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, ते लोक ईडब्ल्यूएस वर्गात येतात. - अनुसूचित जाती-जमाती, अन्य मागासवर्गीयांना याआधीच आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा ईडब्ल्यूएस वर्गात समावेश केला जात नाही. 

घटनादुरुस्तीच्या बाजूनेन्या. दिनेश माहेश्वरी : यामुळे राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेला धोका पोहोचण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षणाची केलेली तरतूद हे सर्वसमावेशक दृष्टिकोनातून टाकलेले पाऊल आहे. हे केवळ सामाजिकदृष्ट्या मागास व्यक्तींसाठी असू शकत नाही. दुरुस्तीमुळे ५० टक्के आरक्षणाच्या कमाल मर्यादेचा भंग होत नाही. कमाल मर्यादेत लवचिकता राहू शकते.न्या. बेला त्रिवेदी : दुरुस्ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाच्या विकासासाठी टाकलेले सकारात्मक पाऊल आहे. याला अवास्तव वर्गीकरण असे संबोधता येणार नाही. या वर्गाला वेगळा दर्जा देणे हे अवास्तव नाही. समानांना विषम वागणूक दिली जाऊ शकत नाही. असमानांना समानांप्रमाणे वागणूक देणे, हा समानतेच्या तत्त्वाचा भंग आहे. न्या. जे. बी. पारडीवाला : आरक्षण हे सर्वकालीन राहू शकत नाही. यासाठी निश्चितपणे काही कालमर्यादा आवश्यक आहे. एखाद्या समाजाला दिलेले आरक्षण हे अबाधित राहू शकत नाही. यावर निश्चितपणे पुनर्विचाराची आवश्यकता आहे.घटनादुरुस्तीच्या विरोधातसरन्यायाधीश उदय लळित : राज्यघटना कुणाला वगळण्याला परवानगी देत नाही. ही दुरुस्ती सामाजिक न्यायाच्या तत्त्वाला गौण ठरवून घटनेच्या मूळ संरचनेला बाधा पोहोचविते. घटनेतील तरतुदीमुळे सामाजिक व मागासवर्गांना फायदे मिळत आहेत. ते चांगल्या रितीने समाजात स्थिर झाले आहे, असा विश्वास ठेवावा, यासाठी केलेली ही घटनादुरुस्ती एकप्रकारची फसवणूक आहे. एखाद्या घटकाला सामाजिक उत्पत्तीच्या आधारावर वगळणे, ही कृती समानतेची संहिता नष्ट करते.न्या. एस. रवींद्र भट्ट : गेल्या सात दशकांत सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदा एखाद्या घटकाला वगळण्याच्या व भेदभावाच्या संकल्पनेला मान्यता मिळाली. राज्यघटना ही एखाद्या वर्गाला वगळण्याची भाषा करीत नाही. एखाद्या घटकाला वगळण्याची केलेली भाषा न्यायाचे तत्त्व व राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भंग आहे.

टॅग्स :reservationआरक्षण