खा. संजय सिंह अटकेत; ‘आप’ला मोठा हादरा; मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 05:42 IST2023-10-05T05:41:34+5:302023-10-05T05:42:20+5:30

दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात राज्यसभा सदस्य संजय सिंह यांना अटक करीत आज ईडीने  सत्ताधारी आम आदमी पार्टीला आणखी एक मोठा हादरा दिला.

eat Sanjay Singh Arrested; Big shock to 'Aap' | खा. संजय सिंह अटकेत; ‘आप’ला मोठा हादरा; मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी कारवाई

खा. संजय सिंह अटकेत; ‘आप’ला मोठा हादरा; मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी कारवाई

नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात राज्यसभा सदस्य संजय सिंह यांना अटक करीत आज ईडीने  सत्ताधारी आम आदमी पार्टीला आणखी एक मोठा हादरा दिला. मनीष सिसोदिया यांच्या पाठोपाठ मद्य धोरण घोटाळ्यातील दुसरी सर्वात मोठी अटक ठरली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे लवकरच या घोटाळ्याचे सूत्रधार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचतील, असा दावा भाजपचे नेते करीत आहेत.

मरेन पण घाबरणार नाही

कुठलाही पुरावा हाती लागला नसतानाही आपल्याला बळजबरीने अटक करण्यात आली आहे. आपल्याला मरण मंजूर आहे; पण घाबरणे मंजूर नाही, असे संजय सिंह यांनी म्हटले आहे.

Web Title: eat Sanjay Singh Arrested; Big shock to 'Aap'

टॅग्स :AAPआप